प्रिया बापटने बनविल्या पुरणपोळ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2016 11:31 IST2016-03-24T18:31:33+5:302016-03-24T11:31:33+5:30
यंदा ही मी किचनचा कारभार स्वत: हातात घेतला व पुरणपोळया बनविल्या असल्याचे प्रिया बापटने लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले
.jpg)
प्रिया बापटने बनविल्या पुरणपोळ्या
आ कालच्या धावत्या युगात माणसांना एकमेकांशी संवाद साधायला देखील वेळ नसतो. त्यामुळे होळी सारखे सणच माणसांना एकत्रित आणण्याचं काम करतात. या उत्साहादिवशी कलर जरी आम्ही खेळत नसलो तरी पुरणपोळयांच जेवण करतो, व नातेवाईक, मित्रमंडळी सर्व एकत्रित येऊन या गोड जेवणाचा आस्वाद घेतो. यंदा ही मी किचनचा कारभार स्वत: हातात घेतला व पुरणपोळया बनविल्या असल्याचे प्रिया बापटने लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले. चला तर या सुंदर अभिनेत्री प्रिया बापटने बनविलेल्या पुरणपोळया अधिक चविष्ट झाल्या असतील हे नक्की