शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
2
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
3
६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
4
Good Luck Cafe: बन मस्क्यामध्ये काचेचे तुकडे; एफ. सी. रोडवरील गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित
5
Accident: आंब्याने भरलेली लॉरी मिनी ट्रकवर उलटली; ९ जण ठार, अनेकजण जखमी!
6
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
7
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
8
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
9
नवी मुंबई: बेलापूरमधील पारसिक टेकडीवर भूस्खलन; मातीच्या ढिगाऱ्यासह झाडे उन्मळून पडली
10
Anthem Biosciences IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला; कधीपर्यंत आणि किती करावी लागेल गुंतवणूक, GMP किती?
11
मनसेचे २ दिवसीय शिबिर, ठाकरे बंधू युतीवर भूमिका ठरणार; राज ठाकरे काय देणार 'कानमंत्र'?
12
'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले
13
अरे देवा! आई वारंवार भेंडीची भाजी बनवायची म्हणून लेक चिडला, १२०० किमी दूर पळून गेला अन्...
14
नोकरीसाठी डिग्री आणि सीव्हीची गरज नाही! थेट १ कोटी रुपयांचं पॅकेज, फक्त 'या' २ अटी पूर्ण करा
15
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
16
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
17
"कलाकाराला ऐकून घ्यावंच लागतं, पण..." शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेचं पुन्हा प्रत्युत्तर
18
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
19
साप्ताहिक राशीभविष्य: २ राजयोगांचा ९ राशींना दुपटीने लाभ, सुबत्ता-भरभराट; गुंतवणुकीत नफा!
20
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार

वाढत्या कोरोनाच्या प्रसारात टीबी झाल्यास काय करायचे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 14:17 IST

Prevention of TB : टीबीचे निदानच झाले नाही किंवा त्यावर उपचार झाले नाहीत, तर तुमची प्रकृती खालावत जाते आणि त्याचबरोबर या विकाराचे संक्रमण तुमच्या आजुबाजूच्या लोकांना तसेच एकंदर समुदायात होण्याची शक्यता वाढते. 

डॉ. राजीवा रंजन, कन्सल्टंट फिजिशिअन

जर तुमच्या आसपास कोणी ट्युबरक्युलॉसिस (टीबी) झालेला रुग्ण असेल किंवा तुम्हाला अलीकडील काळात खोकला, ताप, रात्री घाम येणे, भूक न लागणे  वा अतिशय थकवा जाणवत असेल तर तुम्हाला टीबी झालेला असण्याची शक्यता आहे. तसेच सध्या कोरोना विषाणूची साथ आहे आणि दोन्ही आजारांची लक्षणे सारखी आहेत, त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष न करणे सर्वांत चांगले. त्वरित तुमच्या डॉक्टरांना दाखवा. विशिष्ट त्वचा किंवा/आणि रक्ताच्या चाचण्या टीबीच्या निदानासाठी केल्या जातात, त्यात टीबीचे निदान झाले तर त्वरित उपचार सुरू करणे आवश्यक असते. टीबीचे निदानच झाले नाही किंवा त्यावर उपचार झाले नाहीत, तर तुमची प्रकृती खालावत जाते आणि त्याचबरोबर या विकाराचे संक्रमण तुमच्या आजुबाजूच्या लोकांना तसेच एकंदर समुदायात होण्याची शक्यता वाढते. 

तुम्हाला टीबीचे निदान झाले, विशेषत: कोरोनाची साथ असताना टीबीचे निदान झाले, तर तुम्ही काय करू शकता हे खाली दिले आहे:

निक्षय संपर्क

टीबीची लक्षणे, निदान, चाचण्या, उपचारांचे पर्याय, औषधे आणि अन्य बाबींबाबत तुम्हाला काही शंका असतील, तर ही हेल्पलाइन आहे. ही हेल्पलाइन रुग्णांना माहिती व मदत करण्यासाठी  १४ भाषांमध्ये काम करते: १८००-११-६६६६ 

नियमित औषधे

एकदा उपचार सुरू झाले की, औषधे नियमितपणे घेतली जातील याची काळजी घ्या. औषधे अजिबात चुकवू नका. औषधे आणि ती घेण्याचा कालावधी प्रादुर्भावाचे ठिकाण, तुमचे वय, औषधाला असलेला संभाव्य प्रतिरोध आणि सुप्त किंवा सक्रिय टीबीसारखे टीबीचे प्रकार यांवर अवलंबून असतो. 

ट्रॅकिंग

सध्याच्या साथीच्या काळात डॉट (डायरेक्टली ऑब्झर्व्ह्ड थेरपी- यामध्ये तुम्ही तुमच्या डॉक्टरांना दररोज भेटता) शक्य होत नसली, तरी दररोज काहीतरी अॅक्टिव्हिटी करा आणि औषधे या अॅक्टिव्हिटीच्या आधी किंवा नंतर घ्या. या मार्गाने तुम्ही एक दिनक्रम कायम राखू शकता. तुम्ही मित्रमंडळी/कुटुंबीय यांनाही तुम्हाला आठवण करून देण्यास सांगू शकता.

कॅलेंडर

तुमची औषधे दररोज ठरलेल्या वेळी घ्या आणि औषधे घेतल्यानंतर कॅलेंडरवर तशी खूण करून टाका. एका दिवसाची औषधे चुकली तरी डॉक्टरांशी संपर्क साधा. 

वैयक्तिक स्वच्छता

नेहमी सोबत टिश्यू पेपर बाळगा आणि खोकला अथवा शिंक आल्यास तो नाकासमोर धरा. एकदा वापरल्यानंतर टिश्यूपेपर फेकून द्या. तुमच्या खोलीत ताजी हवा राहील याची काळजी घ्या. टीबीचे जीवाणू बंदिस्त जागेत वाढतात. हे टाळण्यासाठी मोकळ्या हवेत राहा. 

प्रतिबंध:

काही काळ कोणाशीही निकट संपर्क टाळा. तुमच्या डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतरच कुटुंबियांसोबत मिसळा. टीबी आणि कोरोनाविषाणू हे दोन्ही संसर्गजन्य आजार आहेत. त्यामुळे दोहोंकडे सामाजिक कलंकासारखे बघितले जाते आणि हे आजार असलेल्यांना भेदाची वागणूक दिली जाते. त्यामुळे टीबी/कोव्हिड-१९ यांबाबतच्या प्रेरक कथा सांगण्यासाठी वैद्यकीय व्यावसायिक, केअरगिव्हर्स, रुग्णांचे कुटंबीय आणि मित्रमंडळी आदींनी पुढे यावे. टीबी झालेल्या रुग्णांबाबत पूर्वग्रह बाळगू नका किंवा त्यांना आजार झाल्यामुळे एका साच्यात बसवू नका.

Healthy Breakfast Ideas : कमी कॅलरीजसह पौष्टीक नाष्ता करायचा असेल तर हे ५ पर्याय ठरतील बेस्ट ऑप्शन; फिट राहण्याचा सोपा फंडा

अशी वागणूक मिळाल्यास ते प्रतिबंधात्मक उपाय करणार नाहीत, आरोग्यपूर्ण सवयी लावून घेणार नाही आणि परिस्थिती आणखी वाईट होईल. लवकर तपासणी, निदान व उपचार यांबद्दल सकारात्मक बोला. तुम्ही टीबीतून बाहेर आला असाल, तर तुमचा अनुभव सर्वांना सांगा. ते उपयुक्त ठरते! लक्षात ठेवा, काही आठवडे उपचार घेतल्यानंतर तुमच्यापासून कोणालाही संसर्ग होण्याची शक्यता उरत नाही. तुम्हाला केवळ डॉक्टर सांगतील तेवढा काळ औषधे घेत राहण्याची आवश्यकता असते. तेव्हा टीबीला घाबरू नका. हा आजार पूर्णपणे बरा होण्याजोगा आहे. CoronaVirus News : धोका वाढला! शरीरात १२ आठवडे पडून राहतोय कोरोना; तज्ज्ञांनी सांगितली लॉन्ड कोविडची लक्षणं..... 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यExpert Opinionतज्ज्ञांचा सल्ला