शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

कोरोना झाल्यानंतर का गळत आहेत तुमचे केस? असू शकतात कोरोनाचे हे गंभीर दुष्परिणाम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 15:46 IST

आता कोरोना रूग्णांमध्ये केस गळणे (Hair Loss) ही आणखी एक समस्या दिसून येत आहे. एका नवीन संशोधनादरम्यान ही बाब समोर आली आहे.

आता कोरोना रूग्णांमध्ये केस गळणे (Hair Loss) ही आणखी एक समस्या दिसून येत आहे. एका नवीन संशोधनादरम्यान ही बाब समोर आली आहे. (Post Covid-19 hair loss)

कोरोना आणि केस गळतीची समस्याकोरोना आणि केस गळती यांच्यात काय संबंध आहे, याबद्दल जाणून घेण्यासाठी वैज्ञानिक आणि वैद्यकीय तज्ञांनी सखोल अभ्यास केला. या अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की, कोरोनामुळे बऱ्याच लोकांचे केस प्रचंड प्रमाणात गळायला लागले आहेत.

इंडियन युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिन अ‍ॅन्ड सर्व्हायवर कॉर्प फेसबुकचे प्रोफेसर नताली लॅमबर्ट यांच्या टीमने यासंदर्भात सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात १५०० लोकांचा समावेश होता. सर्व्हेमध्ये सामील असलेल्या सर्व लोकांना बऱ्याच काळासाठी कोरोनाची लागण झाली होती. या आजारातून बरे झाल्यानंतरही त्याचा परिणाम बर्‍याच दिवसांपर्यंत दिसून आला. या अभ्यासाच्या अहवालानुसार, सर्वेक्षणात सामील झालेल्या २५ लोकांमध्ये केस गळतीची समस्या आढळली. या दरम्यान, सर्दी आणि नाक बंद होण्याच्या समस्येपेक्षा केस गळतीची समस्या अधिक असल्याचे अनेक रुग्णांनी सांगितले.केस गळतीचे मुख्य कारणया संशोधनानंतर, कोरोना रूग्णाचे केस इतके कसे गळतात, याबद्द्ल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली होती. परंतु यामागचे वैज्ञानिक कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतु काही अभ्यासकांनी, कोरोना काळातील ताण आणि तणाव हेच केस गळतीचे मुख्य कारण असल्याचे म्हटले आहे. या स्थितीस ‘टेलोजेन इफ्लुव्हियम’ असे देखील म्हणतात. टेलोजेन इफ्लुव्हियममध्ये कोणत्याही रोग किंवा ताण- तणावामुळे काही काळ केस गळतीची समस्या निर्माण होते. याशिवाय संसर्गाच्या वेळी पौष्टिक आहाराअभावीही आपले केसही गळू शकतात.बचाव कसा कराल?तज्ञाच्या सूचनेनुसार, कोरोनामुळे केस गळणे हे केवळ तात्पुरत्या स्वरुपात असू शकते. यावेळी, रुग्णाने आपला ताण कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. या व्यतिरिक्त आपला आहार सर्वात महत्त्वाचा आहे. यादरम्यान, व्हिटॅमिन-डी आणि आयर्न युक्त, पौष्टिक घटक असलेले आरोग्यदायी अन्न आपल्या शरीरासाठी सर्वोत्तम आहे. यातून मिळणारी रोग प्रतिकारशक्तीच आपल्याला या विषाणूशी लढण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.डाएटमध्ये प्रोटीन घ्याअशा केसगळतीमध्ये साधारणपणे एका दिवसात १०० केस तुटतात. मात्र, अशा परिस्थितीत रोज ३०० ते ४०० केस तुटतात. त्यामुळे कोरोनावर मात केल्यानंतर रुग्णांनी पोषक तत्त्व घेण्याचा सल्ला दिला जातो. आहारात प्रोटीनचा अधिक समावेश केला पाहिजे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्याHair Care Tipsकेसांची काळजी