दात व्यवस्थित घासत नसाल तर अनेक जीवघेण्या आजारांचा करावा लागू शकतो सामना!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 10:19 AM2019-09-06T10:19:54+5:302019-09-06T10:26:37+5:30

ब्रशिंग म्हणजेच दात घासण्याला एक रूटीनचा भाग मानून कसाही घाईघाईने ब्रश करता का? किंवा रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करायला विसरता का?

Poor oral health linked with more than one deadly diseases | दात व्यवस्थित घासत नसाल तर अनेक जीवघेण्या आजारांचा करावा लागू शकतो सामना!

दात व्यवस्थित घासत नसाल तर अनेक जीवघेण्या आजारांचा करावा लागू शकतो सामना!

googlenewsNext

(Image Credit : independent.ie)

ब्रशिंग म्हणजेच दात घासण्याला एक रूटीनचा भाग मानून कसाही घाईघाईने ब्रश करता का? किंवा रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करायला विसरता का? तसेच विकेंडला आळस करून ब्रश न करताच नाश्ता--चहा घेता का? जर याचं उत्तर हो असं अशेल तर वेळीच सावध व्हा. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आले आहे की, खराब ओरल हेल्थमुळे म्हणजेच तोंडाचं आरोग्य व्यवस्थित नसेल तर लिव्हरचा कॅन्सर होण्याचा धोका ७५ टक्क्यांनी वाढतो.

काय सांगतो रिसर्च?

(Image Credit : paddingtondentistry.com.au)

यूकेच्या बेल्फास्ट येथील क्वीन्स युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी यूकेतील ४ लाख ७० हजार लोकांवर एक रिसर्च केला आणि त्यांच्याकडे मिळालेल्या डेटाचं विश्लेषण करण्यात आलं. या रिसर्चमध्ये ओरल हेल्थ कंडीशन आणि पोटाशी निगडीत अनेक प्रकारचे कॅन्सर जसे की लिव्हर कॅन्सर, रेक्टम कॅन्सर आणि पॅन्क्रिआटिक कॅन्सर यांच्यात काय कनेक्शन आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या रिसर्चमधून असे समोर आले की, तोंडाशी निगडीत कॉमन समस्या जसे की, तोंडात फोड येणे, हिरड्यांमध्ये सूज येणे, दात सैल होणे आणि कॅन्सरमध्ये संबंध आहे.

निष्कर्ष काय निघाला?

(Image Credit : irishtimes.com)

पोटाशी संबंधी इतर कॅन्सर आणि खराब ओरल हेल्थ यांचा मुख्य असा काहीही संबंध बघायला मिळाला नाही. पण हेपाटोबायलरी कॅन्सर आणि ओरल हेल्थ यांच्या संबंध आढळून आला. इतकेच नाही तर तोंडाच्या खराब आरोग्यामुळे केवळ कॅन्सरच नाही तर हार्ट डिजीज, स्ट्रोक आणि डायबिटीससारख्या समस्यांचा धोकाही अनेक पटीने वाढतो. ६ वर्ष या रिसर्चचा फालोअप घेण्यात आला, ज्यातून हे समोर आलं की, रिसर्चमध्ये सहभागी ४ लाख ७० हजार लोकांपैकी ४ हजार ६९ लोकांना गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कॅन्सर आहे. मात्र, यातील केवळ १३ टक्के लोकांना खराब ओरल हेल्थची समस्या होती.

मायक्रोब्समुळे आजारांचा धोका

(Image Credit : aarp.org)

खराब ओरल हेल्थ आणि लिव्हर कॅन्सर यांच्यात काय संबंध आहे, याबाबत काही खास माहिती मिळाली नाही. एक संभावित कारण तोंडात आणि आतड्यांमध्ये असलेले मायक्रोब्स असू शकतात, जे आजार वाढवतात. लिव्हर आपल्या शरीराचया इंजिनासारखं असतं, जे शरीरातून बॅक्टेरिया आणि टॉक्सिन बाहेर काढतं. पण जेव्हा लिव्हर स्वत: बिघडतं ज्याला हेपेटायटिस, लिव्हर कॅन्सर किंवा लिव्हर सिरॉसिससारख्या समस्यांमुळे तेव्हा लिव्हरचं कार्य कमी होतं. अशात लिव्हर शरीरात जास्त वेळ ठेवल्याने आणखी जास्त नुकसान होऊ शकतं. 

Web Title: Poor oral health linked with more than one deadly diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.