शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे: पाच पिढ्यांची साक्षीदार ‘विठाबाई’! महाराष्ट्रातील ज्येष्ठ आजीबाईचे ११४व्या वर्षी निधन
2
मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
3
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...
4
पुढील वर्षी असं काही होईल, जे यापूर्वी कधीच झालं नाही, बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी
5
महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट
6
Virat Kohli Celebration : चेहऱ्यावर हसू अन् खातं उघडल्याचा 'विराट' आनंद! व्हिडिओ बघाच
7
Crime: एकेकाळी 'राज्यस्तरीय पैलवान', लग्नानंतर ड्रग्जचं व्यसन जडलं, पैशांसाठी मुलाला विकले!
8
अफगाणिस्तानातून कोणकोणत्या नद्या पाकिस्तानच्या दिशेने वाहतात? तालिबानने प्रवाहच रोखला तर काय होईल?
9
भारतीय नर्सला सिंगापूरमध्ये १४ महिन्यांचा कारावास अन् २ चाबकाचे फटके; असं नेमकं काय घडलं?
10
IND vs AUS 3rd ODI : 'या' पठ्ठ्यानं कोच गंभीरचा विश्वास ठरवला सार्थ! ऑस्ट्रेलियनं संघ २३६ धावांवर ऑलआउट
11
जैन बोर्डिंगचा व्यवहार १ तारखेच्या अगोदर रद्द नाही झाला तर संपूर्ण देशभर मोठे आंदोलन; जैन मुनींचा इशारा
12
पाकिस्तान पुन्हा तोंडघशी पडला; UN मध्ये काश्मीरचा मुद्दा उपस्थित करताच भारतानं दाखवला आरसा
13
Shreyas Iyer Brilliant Catch : श्रेयसनं घेतला जबरदस्त कॅच! पण ऑस्ट्रेलियन बॅटरसह त्यानंही सोडलं मैदान; नेमकं काय घडलं?
14
ट्रम्प आता चीनशी पंगा घेणार...! जिनपिंग यांना थेट तैवानवरून जाब विचारणार, आशियाच्या दौऱ्यावर निघाले
15
Pandav Panchami 2025: आजच्या काळात काय आहे पांडव पंचमीचे महत्त्व? तिलाच 'लाभ पंचमी' का म्हणतात?
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर; मोदी सरकारनं 'या' प्रस्तावाला दिली मंजुरी, जाणून घ्या
17
VIRAL : एका आठवड्यात पैसे परत करेन म्हणणारी 'ऑनलाइन' मैत्रीण पालटली! १५ हजारांची मदत करणार्‍यालाच सुनावलं
18
पीएसआय गोपाल बदने परळीचा, शेवटचे लोकेशन पंढरपूर; प्रशांत बनकरचे आई-वडील म्हणतात...
19
कॅनडाच्या 'त्या' जाहिरातीत असं काय होतं की डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड झाला? व्यापार करार रोखला!
20
Health Tips: ऑक्टोबर हीट कमी करण्यासाठी सकाळी अंशपोटी प्या 'हे' मॅजिक ड्रिंक 

Plastic Surgery Day : प्लास्टिक सर्जरीमध्ये प्लास्टिक वापरले जाते का? वाचा प्लास्टिक सर्जरीची A to Z माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 14:43 IST

15 जुलै  हा राष्ट्रीय प्लास्टिक सर्जरी दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त प्लास्टिक सर्जरीबाबतची माहिती घेताना, त्याविषयीचे गैरसमज दूर होणेही गरजेचे आहे.

वैद्यकशास्त्रातील आधुनिक उपचार पद्धतीमुळे आज मानवाचे जीवन सुखकर झाले. अनेक आजारांपासून त्याला मुक्ती मिळाली आहे. नव्या, आधुनिक तंत्रज्ञानाने दुर्धर आजारांवरही उपचार करणे सोपे झाले आहे. प्लास्टिक सर्जरी ही अशीच एक आधुनिक उपचार पद्धती आहे. 15 जुलै  हा राष्ट्रीय प्लास्टिक सर्जरी दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त प्लास्टिक सर्जरीबाबतची माहिती घेताना, त्याविषयीचे गैरसमज दूर होणेही गरजेचे आहे.

प्लास्टिक सर्जरी फक्त सुंदर दिसण्यासाठी आहे का? प्लास्टिक सर्जरी फक्त श्रीमंतांसाठी आहे का? प्लास्टिक सर्जरीमध्ये प्लास्टिक वापरले जाते का? प्लास्टिक सर्जरी फक्त त्वचा रोग असणाऱ्या रुग्णांसाठी असते का? असे एक ना अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडतात. प्लास्टिक सर्जरीबाबत अनेक समज गैरसमज आहे. आजकाल तर सोशल मीडियावर कोण काय माहिती टाकेल आणि काय गैरसमज पसरतील, याचा नेम नाही. व्हाट्सएप विद्यापीठातील तज्ज्ञ तर प्रत्येक विषयावर स्वतःचे मत मांडत असतात, त्यातूनही अनेक गैरसमज पसरतात. 

प्लास्टिक सर्जरीमधील प्लास्टिक हा शब्द ग्रीक या भाषेतून आला आहे. प्लास्टिकोज या मूळ शब्दापासून त्याची उत्पत्ती झाली आहे. प्लास्टिकोज म्हणजे पुनर्मुद्रण (रिमॉडेलिंग). प्लास्टिक सर्जरी म्हणजे उती पुनर्मुद्रण कला (टिश्यू रिमॉडेलिंग). 

सुश्रुतला “प्लॅस्टिक सर्जरीचे जनक” मानले जाते. ते इ.स.पू. 1000 आणि 800 दरम्यान कधीकाळी भारतात राहिले आणि प्राचीन भारतात औषधांच्या प्रगतीसाठी ते जबाबदार आहेत. त्यांनी शरीरशास्त्र, पॅथोफिजियोलॉजी आणि उपचारात्मक रणनीती यांचे शिक्षण अतुलनीय तेजस्वीपणाचे होते, विशेषकरून ऐतिहासिक काळातील त्याच्या वेळेचा विचार केला. ते अनुनासिक पुनर्रचनासाठी(Nasal Reconstruction) प्रख्यात आहेत, जे हिंदू औषधांच्या वैदिक कालखंडातील त्याच्या चित्रणातून संपूर्ण साहित्यात सापडतात.

आधुनिक प्लास्टिक सर्जरीचा जनक म्हणून ओळखल्या जाणार्‍या डॉ. हॅरोल्ड गिलिस यांनी दुसर्‍या महायुद्धात जगातील प्रथम यशस्वी त्वचेच्या कलम विकसित केले(Skin Graft). डॉ. गिलिस यांनी गंभीर जखमी आणि अपंग सैनिकांचे उपचार करण्यासाठी लवकर प्लास्टिक सर्जरीचे तंत्र विकसित केले ज्यामुळे ते सामान्य नागरिक म्हणून संपूर्ण जीवन जगू शकले.

प्लास्टिक सर्जरी ही कुठल्याही एका अवयवाशी निगडीत नाही. प्लास्टिक सर्जरी ही नखांपासून ते केसापर्यंत कोणत्याही बाह्य अवयवावर वापरता येते. केसरोपण (हेअर ट्रान्सप्लांट), लायपोसक्शन व टमी टक, स्तनांच्या सौंदर्य शस्त्रक्रिया, नाक सुंदर बनविणे (रायनोप्लास्टी) या प्रकारच्या अॅस्थेटिक सर्जरी हा प्लास्टिक सर्जरीचा एक भाग आहे. याव्यतिरिक्त प्लास्टिक सर्जरी ही बऱ्याच आजारांना उपयुक्त असते, जसे की चेहऱ्यावरच्या जखमा, हातावरील जखमा, मधुमेहामुळे पायावर झालेल्या जखमा (डायबेटिक फूट), जन्मतः असलेले व्यंग, चिवट जखमा, भाजलेल्या जखमांवर उपचार, विकृती सुधारणा, ट्रॉमा री-कनस्ट्रक्शन,कर्करोग री-कनस्ट्रक्शन  प्लास्टिक सर्जरीने उपचार करता येतात. 

प्लास्टिक सर्जरी ही सर्वसामान्य माणसांना सुद्धा परवडणारी आहे. शस्त्रक्रियेतील वैद्यकीय पदव्युत्तर(M.S/DNB)अभ्यासक्रमानंतर एमसीएच(MCh Plastic Surgery)किंवा डीएनबी(DNB Plastic Surgery)ही पदवी असलेले डॉक्टर प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी पात्र असतात. 

असोसिएशन ऑफ प्लास्टिक सर्जन ऑफ इंडिया(APSI) हे 15 जुलै हा राष्ट्रीय प्लास्टिक सर्जरी दिन साजरा करतात. यानिमित्त जनजागृती व रुग्णांना मोफत सल्ला व चिकित्सा करण्यासारखे उपक्रम राबविले जातात. याबाबत वृत्तपत्रांतूनही अनेकदा माहिती येते. उपरोक्त आजाराची शंका असणाऱ्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांकडून चिकित्सा करून घेतल्यास त्यांना उपचारांचा निर्णय घेता येऊ शकतो. 

डॉ. प्रितीश श्रीकांत भावसार, प्लास्टिक सर्जन (एमसीएच(MCh), प्लास्टिक सर्जरी)लक्ष्मी हॉस्पिटल, डोंबिवली (पूर्व). 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स