सावधान, बाहेर इडली खात असाल तर...; कॅन्सरचा धोका; कर्नाटकमध्ये ५० टक्के नमुन्यांमध्ये आढळले घटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 07:50 IST2025-03-01T07:49:00+5:302025-03-01T07:50:03+5:30

प्लास्टिकच्या वापरामुळे कॅन्सर होण्याचीही भीती लोकांच्या मनात डोकावली. हा सारा मामला लक्षात घेता इडली उकडण्यासाठी प्लास्टिकचे आवरण वापरण्यास कर्नाटक सरकारने मनाई केली आहे.

Plastic idli containers? Cancer risk; found in 50 percent of samples... | सावधान, बाहेर इडली खात असाल तर...; कॅन्सरचा धोका; कर्नाटकमध्ये ५० टक्के नमुन्यांमध्ये आढळले घटक

सावधान, बाहेर इडली खात असाल तर...; कॅन्सरचा धोका; कर्नाटकमध्ये ५० टक्के नमुन्यांमध्ये आढळले घटक

बंगळुरू : कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधील अनेक हॉटेल तसेच रस्त्यावरील ठेल्यांवर इडली तयार करताना प्लास्टिकच्या आवरणाचा वापर होतो. यासंदर्भात कर्नाटक अन्नसुरक्षा विभागाने तपासणी केलेल्या इडल्यांच्या नमुन्यांपैकी ५० टक्के नमुने आरोग्यासाठी घातक असल्याचे आढळून आले.

प्लास्टिकच्या वापरामुळे कॅन्सर होण्याचीही भीती लोकांच्या मनात डोकावली. हा सारा मामला लक्षात घेता इडली उकडण्यासाठी प्लास्टिकचे आवरण वापरण्यास कर्नाटक सरकारने मनाई केली आहे. (वृत्तसंस्था)

नेमके काय आढळले?
कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी हा निर्णय जाहीर केला.  विविध हॉटेल, रस्त्यावरील ठेल्यांमधून इडलीचे २५१ नमुने गोळा केले.त्याच्या चाचण्या केल्या असता ५१ नमुन्यांमध्ये कर्करोग निर्माण करणारे पदार्थ आढळले. 

घातक पद्धतीने खाद्यपदार्थ बनविण्यावर बंदी
अशा इडल्यांचे सेवन केल्यास आरोग्य धोक्यात येऊ शकते.  इडली उकडण्यासाठी सुती कापडाऐवजी प्लास्टिकच्या आवरणाचा उपयोग केला जात आहे.  या प्रक्रियेत प्लास्टिक गरम झाल्यानंतर त्यातून विषारी, तसेच कर्करोगास कारणीभूत ठरणारी रसायने तयार होतात. त्याचा परिणाम इडल्यांच्या दर्जावर होतो. अशा इडल्या खाल्ल्यास कर्करोग होण्याचा धोका आहे, असे मंत्र्यांनी माहिती देताना सांगितले.
आदेशाचा भंग केल्यास कठोर कारवाई

खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी प्लास्टिक आवरणाचा वापर करण्यावर कर्नाटक सरकारने बंदी घातली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, रस्त्यावरचे ठेले येथे या आदेशाचा भंग झाल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. इडली उकडताना प्लास्टिक आवरणाचा वापरल्यास त्यातून निर्माण होणाऱ्या रसायनांमुळे खाद्यपदार्थाचा दर्जा बिघडतो. तो सेवन केल्यास कर्करोग होण्याची शक्यता असल्याची माहिती सरकारने दिली आहे.

Web Title: Plastic idli containers? Cancer risk; found in 50 percent of samples...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.