शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पुरुषांनो पर्सनल हायजिनकडे करु नका दुर्लक्ष, गंभीर आजार कायमस्वरुपी बळावतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 13:52 IST

महिलांमध्ये जशी वैयक्तिक स्वच्छता महत्त्वाची असते, तशीच स्वच्छता पुरूषांनीही ठेवणं गरजेचं असतं. अनेकदा वैयक्तिक स्वच्छतेकडं दुर्लक्ष केल्यानं अनेक गंभीर आजार किंवा त्वचा विकारांचा सामना करावा लागतो.

उत्तम आरोग्यासाठी (Good health) वैयक्तिक स्वच्छतेची म्हणजेच पर्सनल हायजीनची (Personal Hygiene) काळजी घेणं आवश्यक असतं. वैयक्तिक स्वच्छतेकडं दुर्लक्ष केल्यास संसर्गजन्य (Viral) तसंच अन्य आजारांचा धोका वाढतो. महिलांमध्ये जशी वैयक्तिक स्वच्छता महत्त्वाची असते, तशीच स्वच्छता पुरूषांनीही ठेवणं गरजेचं असतं. अनेकदा वैयक्तिक स्वच्छतेकडं दुर्लक्ष केल्यानं अनेक गंभीर आजार किंवा त्वचा विकारांचा सामना करावा लागतो.

पुरूषांनी आपल्या शरीराच्या ४ महत्त्वाच्या भागाची स्व स्वच्छता दैनंदिन करणं गरजेचं आहे. पुरूषांनी दाढी, केस, नखं तसंच जननेंद्रियाजवळील भागाची दररोज स्वच्छता करणं आवश्यक आहे. तसंच अंतर्वस्त्रं, मोजे यांचा वापर करण्यापूर्वी ते स्वच्छ धुतले आहेत की नाहीत याची खात्री करणं गरजेचं आहे. शिंकल्यानंतर, खोकल्यानंतर किंवा एखाद्या प्राण्याला हात लावल्यानंतर बऱ्याचदा पुरूष आपले हात धुवून स्वच्छ करतातच असं नाही. त्यामुळं असं दुर्लक्ष आरोग्यावर विपरीत परिणाम करणारं ठरू शकतं.

सध्याच्या काळात अनेक पुरूषांना केस गळतीच्या (Hair fall) समस्येचा सामना करावा लागत आहे. प्रदूषण, धूलीकण, स्वच्छतेच्या अभावामुळं केस गळणं किंवा संसर्ग झाल्याचं दिसून येत आहे.  त्यामुळे पुरूषांनी नियमित माईल्ड शाम्पूनं (Mild Shampoo) केस धुणं गरजेचं आहे.

याशिवाय वैयक्तिक स्वच्छतेचा भाग म्हणून पुरूषांनी बाहेरून व्यायाम करून आल्यानंतर स्नान (Bath) करणं गरजेचं आहे. यामुळे शरीरावरील हानीकारक जीवाणू, घाण आदी निघून जाते. तसेच यामुळं त्वचा आणि आरोग्य चांगलं राहतं. पुरुषांसाठी सेक्शुअल हायजीनही (Sexual Hygiene) महत्त्वाचं आहे. प्युबिक हेअरची स्वच्छता ठेवणं, तसेच इंटरकोर्सनंतर युरिन करणं आणि जननेंद्रिय स्वच्छ करणं आवश्यक आहे.

पुरूषांनी वेळोवेळी नखांची स्वच्छता ठेवणं आणि ती कापणं गरजेचं आहे. नखांमध्ये घाण साठून राहते. जेवताना ही घाण पोटात गेली तर संसर्ग, पोटदुखी किंवा उलटीचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आजकाल पुरूषांमध्ये लांब दाढी, मिशा ठेवण्याची फॅशन आहे. परंतु, असं करताना स्वच्छतेकडं लक्ष देणंही गरजेचं आहे. कारण दाढीत धुलीकण, घाण जाऊन बसते. यामुळे त्वचेवर व्रण उठणं, खाज सुटणं असे आजार होऊ शकतात.

बॅचलर तरूण आपली अंतर्वस्त्रं (Undergarments) आणि मोज्यांच्या स्वच्छतेकडं दुर्लक्ष करत असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. ही बाब आरोग्यासाठी नुकसानदायी ठरू शकते. यामुळे जननेंद्रियाजवळ संसर्ग होणं, व्रण उठणं, पायांना संसर्ग किंवा चिखल्या होणं आदी समस्या उदभवू शकतात. त्यामुळे महिला जशा वैयक्तिक स्वच्छतेची काटेकोरपणे काळजी घेतात तशीच काळजी पुरुषांनीही घ्यायला हवी. त्यामुळे त्यांचं आरोग्य उत्तम राहील.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स