शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

हाय बीपीच्या रुग्णांचं 'या' गोष्टीकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात! 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 11:05 AM

हाय बीपी म्हणजेच उच्च रक्तदाबाची समस्या ही वेगवेगळ्या कारणांनी वाढू शकते. जर तुम्हाला वाटत असेल की, ऑफिसमधील कामाचा दबाव तुम्ही सहन करु शकत नाही तर थोडावेळ आराम करा.

(Image Credit : IamExpat)

हाय बीपी म्हणजेच उच्च रक्तदाबाची समस्या ही वेगवेगळ्या कारणांनी वाढू शकते. जर तुम्हाला वाटत असेल की, ऑफिसमधील कामाचा दबाव तुम्ही सहन करु शकत नाही तर थोडावेळ आराम करा. तसेच पुरेशी झोप न घेतल्याने तुमची चिंता वाढू शकते. एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, कामाचा वाढता ताण आणि पुरेशी चांगली झोप न घेणे यामुळे हाय बीपीने ग्रस्त असलेल्या लोकांचा हृदयरोगाने मृत्यू होण्याचा धोका तीन पटीने अधिक वाढतो.  

(Image Credit : Medium)

झोपेने ऊर्जेचे स्तर कायम ठेवण्यास मदत

जर्मनीच्या विश्वविद्यालयात म्यूनिचचे प्रोफेसर आणि रिसर्चचे मुख्य लेखक कार्ल-हेंज लायविग म्हणाले की, 'झोपेमुळे ऊर्जेचा स्तर कायम ठेवण्यास, आराम मिळण्यास आणि तणावमुक्त होण्यास मदत मिळते. जर तुम्हाला कामाचा तणाव असेल तर पुरेशा झोपेमुळे तुम्हाला हा तणाव दूर करण्यास मदत मिळू शकते. मात्र दुर्देवाने पुरेशी झोप न घेणे आणि कामाचा तणाव सतत एकत्र होत असतो, आणि जेव्हा या दोन्ही गोष्टी हाय बीपीसोबत एकत्र होतात तेव्हा परिणाम अधिक घातक ठरतात'.

(Image Credit : HuffPost)

हृदयरोगाने मृत्यूचा धोका ३ पटीने वाढतो

या रिसर्चमधून २५ ते ६५ वयोगटातील २ हजार कर्मचाऱ्यांना सहभागी करुन घेण्यात आले होते. यांना हाय बीपीची समस्या तर होती, पण हृदयरोग किंवा डायबिटीस नव्हता. पण तणाव असलेल्या आणि चांगली झोप घेतलेल्या लोकांच्या तुलनेत दोन्हींमध्ये हृदयरोगामुळे मृत्यूचा धोका तीन पटीने अधिक होता. 

(Image Credit : Barnsley Healthy Hearts)

कामाच्या तणावात अडकणे आणि बाहेर न पडणे धोकादायक

यूरोपिय जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव कार्डिओलॉजीमध्ये प्रकाशित निष्कर्षांवरुन हे समोर आलं आहे की, एकट्या कामाच्या तणावामुळे लोकांमध्ये १.६ टक्के अधिक धोका होता, तर चांगली झोप न घेणाऱ्यांमध्ये हा धोका १.८ टक्के अधिक होता. लायविग म्हणाले की, दबावाच्या स्थितीमध्ये फसल्यावर तुमच्याकडे ही स्थिती बदलण्याची कोणतीही शक्ती नसणे जास्त हानिकारक आहे. 

टॅग्स :Heart DiseaseहृदयरोगResearchसंशोधन