्गर्भावस्थेदरम्यान पालकांनीही काळजी घ्यावी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2016 20:08 IST
गर्भधारणा प्रक्रियेदरम्यान पुरुषानेही आपल्या आहार घेण्यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे
्गर्भावस्थेदरम्यान पालकांनीही काळजी घ्यावी !
गर्भावस्थेदरम्यान आईला खाणे - पिणे या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्लानेच आहार घेतला जातो. आईने घेतलेल्या आहाराचा थेट परिणाम बाळावर होतो. त्यामुळे खाण्यापिण्याचे सर्व पथ्थे हे आईलाच पाळावे लागतात. परंतु, मॅकगिल विद्यापीठाच्या संशोधकांचे असे म्हणणे आहे की, गर्भधारणा प्रक्रियेदरम्यान पुरुषानेही आपल्या आहार घेण्यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. पोषक आहाराचे सेवन केल्याने बाळाला कोणतेही शारीरिक अपंगत्व येण्याचा धोका राहत नाही. त्याचबरोबर गर्भपात होण्याचाही धोका कमी असतो. याकरिता केवळ खाण्यापिण्याची आईनेच काळजी घेऊ नये, तर पालकांनेही घेण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे आई काळजी घेते, अगदी तशीच काळजी पालकांनी घेतली तर बाळ अधिक सुदृढ जन्माला येऊ शकते, असाही संशोधकांनी दावा केला.