बालपणापासून पॅरासिटामोल खाण्याने तारुण्यात अस्थमाचा धोका वाढतो, हेही होतात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:03 PM2018-09-19T12:03:10+5:302018-09-19T12:06:36+5:30

नेहमीच डोकेदुखी, अंगदुखी किंवा थोडा ताप आला तर अनेकजण पॅरासिटामोलची गोळी घेतात. पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही गोळी घेणे तुम्हाला महागात पडू शकते.

Paracetamol side effects for liver, skin, kidneys and lungs | बालपणापासून पॅरासिटामोल खाण्याने तारुण्यात अस्थमाचा धोका वाढतो, हेही होतात नुकसान

बालपणापासून पॅरासिटामोल खाण्याने तारुण्यात अस्थमाचा धोका वाढतो, हेही होतात नुकसान

Next

नेहमीच डोकेदुखी, अंगदुखी किंवा थोडा ताप आला तर अनेकजण पॅरासिटामोलची गोळी घेतात. पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही गोळी घेणे तुम्हाला महागात पडू शकते. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, कमी तापात आणि डोकेदुखी झाल्याने ही गोळी घेतल्यास अनेक गंभीर आजार होऊ शकतात. इतकेच नाही तर जे लोक अनेक वर्षांपासून या गोळीचं सेवन करीत आहेत, त्यांना किडनी, लिव्हर आणि इतरही समस्या होऊ शकतात. 

हे झालं मोठ्यांनी पॅरासिटामोल खाण्याच्या नुकसानाबाबत, पण नुकत्याच झालेल्या एका शोधात असे सांगण्यात आले आहे की, जर लहान मुलांनी त्यांच्या जीवनाच्या सरुवातीच्या दोन वर्षात ताप आल्यावर पॅरासिटामोल औषध घेतलं तर १८ वर्षांचे होईपर्यंत त्यांना अस्थमा होण्याचा धोका वाढतो. अभ्यासकांनी म्हटले आहे की, पॅरासिटामोल खाल्याने दमा होण्याचा धोका त्या लोकांना अधिक होतो, ज्यांमध्ये जीएसटीपी१ जीन असतात. 

त्यांनी सांगितले की, पॅरासिटामोल आणि दमा यांच्या भलेही संबंध असला तरी असे नाही की, तापाचं औषध घेतल्यावर दमा होणार. वैज्ञानिकांचं म्हणनं हे की, या परिणामाबाबत जाणून घेण्यासाठीही शोध करण्याची गरज आहे. एका रिपोर्टनुसार, या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी अभ्यासकांनी १८ वयोगटातील ६० लहान मुलांचा अभ्यास केला. यातील सर्वच मुलांच्या परिवारातील कमीत कमी एका व्यक्तीला दमा, एग्जिमा(त्वचा रोग) किंवा अॅलर्जीसंबंधी आजार होता. 

पॅरासिटामोलमुळे होणारे इतर साइड इफेक्ट्स

- पॅरासिटामोलचे अधिक सेवन केल्याने लिव्हरसंबंधी आजार वाढण्याची शक्यता वाढते. 

- तसेच याच्या जास्त सेवनाने किडनीसंबंधी आजार होण्याचाही धोका असतो. 

-  पॅरासिटामोलच्या अधिक सेवनाने शरीराची रोगप्रतिकारकशक्ती कमी होते.

- त्यासोबतच शरीरात अॅलर्जी आणि इन्फेक्शनची समस्याही वाढू लागते.

- पोटाची समस्याही वाढण्याची शक्यता असते. 

- तसेच पचनक्रिया कमजोर होणे आणि पोटात गॅसची तक्रार वाढू शकते. 
 

Web Title: Paracetamol side effects for liver, skin, kidneys and lungs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.