पान १ - स्वाइनचे तीन बळी

By Admin | Updated: July 31, 2015 22:25 IST2015-07-31T22:25:13+5:302015-07-31T22:25:13+5:30

स्वाइनचे तीन बळी

Page 1 - Three victims of swine | पान १ - स्वाइनचे तीन बळी

पान १ - स्वाइनचे तीन बळी

वाइनचे तीन बळी
मुंबई : मार्चनंतर पुन्हा एकदा जुलै महिन्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, स्वाइनने एकाच दिवशी मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात एकूण तीन जणांचा बळी गेला आहे.
भायखळा येथे राहणार्‍या ९ महिन्यांच्या मुलीला नायर रुग्णालयात २५ जुलै रोजी दाखल करण्यात आले. स्वाइनचे निदान झाल्यावर तिला २६ जुलैपासून टॅमिफ्लू देण्यास सुरुवात केली होती. तिला न्यूमोनियाचीही लागण झाली होती. उपचारादरम्यान तिचा ३० जुलै रोजी मृत्यू झाला, अशी माहिती महापालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून मिळाली आहे.
भाईंदरमध्ये गेल्या ६ दिवसांत दुसरा बळी गेला आहे. येथील प्रभाग क्र. १८ मधील मोदी पटेल मार्गावर असलेल्या मेहता-पटेल शॉपिंग सेंटरमध्ये राहणार्‍या सेरली फरदा सानी (६०) या वृद्धेचा स्वाइन फ्लूची लागण झाल्यामुळे २५ जुलै रोजी मीरा रोड येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
उरण तालुक्यात स्वाइन फ्लूने एकाचा मृत्यू झाला आहे. मदन रघुनाथ पाटील (४३) असे या व्यक्तीचे नाव असून तो कंठवली येथे राहणारा आहे. मदन हा २५ जुलैपासून आजारी होता. सुरुवातीला त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला वाशी येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी पहाटे त्याचे निधन झाले.

Web Title: Page 1 - Three victims of swine