शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

पद्मभूषण,पद्मविभूषण 1984पद्मश्री 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:17 IST

पद्मभूषण पद्मविभूषण 1984पद्मश्री 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील 

अमिताभ बच्चन यांच्या आवाजाच्या जादूने भारतीयांना वेड लावले. अत्यंत शुद्ध आणि स्पष्ट शब्दोच्चार आणि खर्जातील आवाजाने त्यांनी अनेक भूमिका जिवंत केल्या. त्याचबरोबर, अनेक गाणीही त्यांच्या आवाजाने अमर झाली. 'रंग बरसे', 'मेरे अंगने में' ही गाणी तर होतीच; पण 'मैं और मेरी तनहाई' तरुणांच्या हृदयातील र्ममबंधातील ठेव बनली. वयाच्या ७२व्या वर्षीही 'शमिताभ'मध्ये त्यांनी गायलेले गाणे लोकप्रिय ठरले. अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता किंवा त्यांचा देश-विदेशांत केला गेलेला सन्मान याच्यापेक्षाही त्यांनी आपल्या आदर्श आयुष्याने सार्वजनिक जीवनात जे मानदंड निर्माण केले ते महत्त्वाचे आहेत. त्यांच्याशी माझा स्वत:चा एक अनुभव एक माणूस म्हणून अमिताभ बच्चन यांची महती किती होती, हे दर्शविणारा होता. लोकमत मीडिया प्रा. लि.च्या वतीने २0११मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी त्यांना घरापासून रिसीव्ह करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली होती. सार्वजनिक कार्यक्रमात त्यांना अनेकदा भेटण्याचा योग मला आला होता. मात्र, या घरच्या भेटीत त्यांच्या अदबशीर वागणुकीने हा महानायक प्रत्यक्ष जीवनात मानवता किती जपतो, याचा प्रत्यय मला आला. त्यांनी कार्यक्रमाची संपूर्ण माहिती माझ्याकडून जाणून घेतलीच; शिवाय लोकमत मीडिया प्रा. लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांच्यासोबतच्या आठवणी सांगून मला अगदी कुटुंबातील असल्यासारखे करून टाकले. जणू काही मी त्यांचा वर्षानुवर्षांचा परिचित आहे, असे वातावरण त्यांनी निर्माण केले. विशेष म्हणजे, हे सगळे अकृत्रिम होते; त्यामध्ये कोठेही अभिनिवेश नव्हता. 'स्टार ऑफ द मिलेनियम' म्हणून गौरविलेले महानायक अमिताभ बच्चन यांचा भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने महासन्मान व्हावा, ही कोट्यवधी भारतीयांची इच्छा असून बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त ही अमूल्य भेट त्यांना मिळावी, अशी अपेक्षा त्यांचे चाहते व्यक्त करीत आहेत. 'भारतरत्न फॉर अमिताभ' ही एक लोकचळवळच सोशल साईटवर या माध्यमातून सुरू झाली आहे. अमिताभ बच्चन यांचे वैशिष्ट्य काय? अगदी सामान्याप्रमाणे आयुष्याला सुरुवात करून स्वत:च्या कर्तृत्वाने ते आज शिखरावर पोहोचले आहेत. अभिनयाचा महामेरू असलेला हा महानायक केवळ आपल्या चित्रपट कारकिर्दीने नव्हे, तर त्याच्या अंगी असेल्या विनम्रता, सचोटी आणि सार्वजनिक जीवनातील शिष्टाचाराने कोट्यवधी भारतीय तरुणांचे खरे आयकॉन बनला आहे. अमिताभ बच्चन यांचे वैशिष्ट्य म्हणजे वयाच्या सत्तराव्या वर्षीही ते चित्रपटसृष्टीतील कोणाही अभिनेत्यापेक्षा अधिक लोकप्रिय आहेत. आंतरराष्ट्रीयतेच्या सीमा ओलांडून फॅन फॉलोअर असणारे अमिताभ हे पाकिस्तानपासून, बांगलादेशपासून आशियातील आणि जगातील सर्वच देशांत तितकेच लोकप्रिय आहे. १९८४मध्येच पद्मश्री अँवॉर्डने त्यांना गौरविले होते. तर, २00१मध्ये पद्मभूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. २0१४मध्ये पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याच्याही पुढे जाऊन फ्रान्स सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'नाईट ऑफ द लेजियन ऑफ द ऑनर' हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. त्यामुळेच भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला 'भारतरत्न' पुरस्कार त्यांना मिळावा, ही त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. जात, धर्म, प्रांत, भाषा, संस्कृती या सर्व भेदांपलीकडे जाऊन देशाला एका सूत्रात बांधण्याची किमया क्रीडा-कलेच्या माध्यमातून होते. अमिताभ यांनी त्यांच्या अफाट लोकप्रियतेमधून राष्ट्रीय एकात्मतेचे कार्य साधले. माणसे जोडण्याचे काम त्यांच्या अभिनयाने केले. 'कुली' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना जीवघेणी दुखापत झाली, तेव्हा अमिताभसाठी मंदिरांमधे नवस बोलले गेले, पीरांना चादर चढवली गेली, चर्चमधल्याही घंटा निनादल्या. अमिताभच्या अफाट लोकप्रियतेची जशी ही खूण होती, तसेच सर्व भिंती तोडून सर्वांच्या हृदयात त्यांनी मिळविलेल्या स्थानाचेही द्योतक होते. अमिताभ नावाच्या सर्वमान्य महानायकाला 'भारतरत्न' मिळाले, तर फारसे वादही होणार नाहीत. जातीय-धार्मिक भावना कमालीच्या टोकदार होत असल्याचे चित्र देशभर आहे. यावर फुंकर घालण्याची ताकद अमिताभच्या 'भारतरत्न'मधे आहे.