आधुनिक काळात मुले मैदानी खेळ, निसर्ग आणि मोकळ्या हवेपासून दूर होऊन मोबाइल व लॅपटॉपच्या काही इंची स्क्रीनमध्ये अडकून पडली आहेत. यामुळे मुलांची नजर कमी होत असून, त्यांना लांबचे पाहण्यात अडचणी येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
नॅशनल चाइल्ड हेल्थ प्रोग्राम अंतर्गत गेल्या वर्षी कर्नाटकच्या शाळांमधील सुमारे सव्वा कोटी मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीत तब्बल १.७२ लाख मुलांमध्ये दृष्टीशी संबंधित विकार आढळले आहेत. तज्ज्ञांनी यावर चिंता व्यक्त केली असून, पालकांना सतर्क होण्याचे आवाहन केले.
यावर उपाय काय?
तज्ज्ञांच्या मते, मुलांनी दररोज किमान दोन तास बाहेर सूर्यप्रकाशात खेळणे आवश्यक आहे. उन्हात वेळ घालवल्याने शरीरातील व्हिटॅमिन-डी आणि डोपामाइनची पातळी वाढते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
दृष्टिदोषाची कारणे
डोळ्यांच्या आजारांमागे केवळ स्क्रीन वेळच नाही, तर खालील घटकही कारणीभूत ठरतात. मायोपियात वाढ : सतत मोबाइल व टीव्ही पाहिल्याने ‘मायोपिया’ (निकटदृष्टी दोष) वेगाने वाढत आहे.शारीरिक सक्रियतेचा अभाव : चार भिंतींच्या आतच जीवन मर्यादित राहिल्याने डोळ्यांना नैसर्गिक व्यायाम मिळत नाही.असंतुलित आहार : बदलत्या जीवनशैलीमुळे पोषक आहाराकडे होणारे दुर्लक्ष.
तज्ज्ञांनी दिलेला इशारा?
मायोपियाचा धोका: तज्ज्ञांच्या मते, सतत जवळच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यामुळे डोळ्यांचे स्नायू त्याच सवयीत बदलतात. यामुळे थकवा, जळजळ आणि डोकेदुखी जाणवते.डोळे कोरडे होण्याची समस्या: एम्सच्या नेत्रतज्ज्ञांनी सांगितले की, मुलांमध्ये ‘डोळे कोरडे होण्याची’ची समस्याही मोठ्या प्रमाणात दिसून येते. मानसिक परिणाम: लहान मुलांना मोबाइल दिल्यामुळे त्यांच्या मानसिक आणि भावनात्मक विकासावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
Web Summary : Excessive screen use endangers children's vision, leading to increased myopia. Experts recommend outdoor play for vitamin D and dopamine. Imbalanced diets and lack of exercise exacerbate the problem, causing dry eyes and potential mental health issues. Parents urged to take precautions.
Web Summary : अत्यधिक स्क्रीन उपयोग से बच्चों की दृष्टि खतरे में है, जिससे मायोपिया बढ़ रहा है। विशेषज्ञ विटामिन डी और डोपामाइन के लिए बाहरी खेलने की सलाह देते हैं। असंतुलित आहार और व्यायाम की कमी से समस्या और बढ़ रही है, जिससे सूखी आंखें और मानसिक स्वास्थ्य समस्याएं हो सकती हैं। अभिभावकों से सावधानी बरतने का आग्रह किया गया है।