शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसच्या पोहोचपासून आदिवासी वाडया, दुर्गम भाग दूरच वर्षभरात गडचिरोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, नंदूरबार, रायगड, वाशिम जिल्हयात सुमार कामगिरी

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

सर्वआवृत्तींसाठीपुणे : राज्यात राहणार्‍या गरीबातील गरीब व्यक्तीला तातडीच्या वेळी दारात आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, त्यांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध व्हाव्यात यासाठी मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस (डायल १०८) गेल्या वर्षभरात आदिवासी वाडया व दुर्गम भागापासून दूरच राहिली आहे. गेल्या वर्षभरात मोठया शहरांमध्यील नागरिकांनाच ही सेवा सर्वाधिक देण्यात आलेली आहे. आदिवासी व दुर्गम जिल्हे असलेल्या गडचिरोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, नंदूरबार, रायगड, वाशिममध्ये या सेवेची कामगिरी सुमारच ठरली आहे.

सर्वआवृत्तींसाठीपुणे : राज्यात राहणार्‍या गरीबातील गरीब व्यक्तीला तातडीच्या वेळी दारात आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, त्यांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध व्हाव्यात यासाठी मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस (डायल १०८) गेल्या वर्षभरात आदिवासी वाडया व दुर्गम भागापासून दूरच राहिली आहे. गेल्या वर्षभरात मोठया शहरांमध्यील नागरिकांनाच ही सेवा सर्वाधिक देण्यात आलेली आहे. आदिवासी व दुर्गम जिल्हे असलेल्या गडचिरोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, नंदूरबार, रायगड, वाशिममध्ये या सेवेची कामगिरी सुमारच ठरली आहे.
तातडीच्या वेळी वैद्यकीय सेवा न मिळाल्याने मृत्यू होण्याचे प्रमाण राज्यात खूप आहे. रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी एकाच क्रमांकाची राज्यव्यापी रुग्णवाहिका सेवा असावी म्हणून गेल्यावर्षी २६ जानेवारीला राज्यशासनाच्या आरोग्य विभागाने कोटयावधी रूपये खर्च करून महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस सुरू केली होती. यासाठी राज्यभरात ९३७ अत्याधुनिक रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या. 'एक फोन करा तुम्ही कोठेही राहत असला तरी तुम्हाला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका तुमच्या दारासमोर अवघ्या काही मिनिटांमध्ये उभी राहिल, अशी डरकाळी त्यावेळी राज्यशासनाने फोडली होती. मात्र या सेवेला वर्ष पूर्ण झाल्यानंतर समोर आलेल्या आकडेवारीवरून ही डरकाळी फक्त डरकाळीच ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
दि. २६ जानेवारी २०१४ ते २६ जानेवारी २०१५ या वर्षभरात गडचिरोलीतील केवळ १ हजार ४८५ जणांनाच या सेवेचा लाभ मिळाला आहे. त्यापाठोपाठ वर्धा जिल्हयात १ हजार ६१७ जणांना, सिंधुदुर्ग जिल्हयात १ हजार ७८२ लोकांना, रत्नागिरी जिल्हयात २ हजार १०० लोकांना, भंडारा जिल्हयातील २ हजार ६१० जणांना, नंदूरबार जिल्हयात २ हजार ८२५ जणांना, रायगड जिल्हयात ३ हजार १२ जणांना, वाशिम जिल्हयात केवळ २ हजार ६४६ जणांनाच या सेवेचा लाभ मिळाला आहे.
याउलट मोठया शहरांमध्ये या सेवेने दुहेरी आकडा गाठला आहे. मुंबई जिल्हयामध्ये एकूण १७ हजार ९१२ जणांना, पुणे जिल्हयात १५ हजार ३१६ जणांना, नागपूर जिल्हयात ८ हजार १४१ जणांना, नांदेड जिल्हयात ८ हजार ५०३ जणांना, नाशिकमध्ये १० हजार १६९ जणांना, ठाणे जिल्हयात १० हजार २१२ जणांना या सेवेचा लाभ देण्यात आला आहे.
या दोन्ही आकडेवारींची तुलना करता आदिवासी वाडयांवर, दुर्गम भागांमध्ये ही सेवा पोहोचतच नसल्याचे सिध्द होत आहे.