शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

Omicron Symptoms : ओमायक्रॉनचं नवं लक्षण आलं समोर, पोटासंबंधी 'ही' समस्या दिसेल तर वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 11:57 IST

Omicron Symptoms : ओमायक्रॉनची काही लक्षणं डेल्टापेक्षा जरा वेगळी आहेत. काही लोकांना सर्दी-खोकला, घशात खवखवसारखी लक्षणं दिसत आहेत.

देशभरात कोरोना व्हायरसचा (Corona Virus) नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन(Omicron) आता वेगाने पसरत आहे. हेल्थ एक्सपर्ट लोकांना ओमायक्रॉनच्या लक्षणांबाबत सांगत आहे. जेणेकरून वेळीच काळजी घेता येईल. ओमायक्रॉनची काही लक्षणं डेल्टापेक्षा जरा वेगळी आहेत. काही लोकांना सर्दी-खोकला, घशात खवखवसारखी लक्षणं दिसत आहेत. पण ओमायक्रॉनची लक्षणं (Omicron Symptoms) इतकीच नाहीत. एक्सपर्ट सांगतात की, ओमायक्रॉन श्वसन संक्रमणासोबतच पोटालाही प्रभावित करू शकतो. ओमायक्रॉनची लक्षणं पोटासंबंधीही आहेत. 

काय आहेत लक्षणं?

जर तुम्हाला ताप न येताही उलटी, मळमळ होणे आणि पोटदुखी होत असेल तर एक्सपर्टनुसार, हे ओमायक्रॉनचं लक्षण असू शकतं. जर तुम्हाला श्वसनासंबंधी लक्षण किंवा ताप न येताही पोटाची समस्या होत असेल तर वेळ न घालवता कोविडची टेस्ट करून घ्यावी. नव्या स्ट्रेनमध्ये जास्तीत जास्त लोकांना पोटाची समस्या आढळून आली आहे. वॅक्सीनेटेड लोकांमध्येही ही लक्षणं आढळून येत आहेत. कोविडच्या काही नव्या लक्षणांमध्ये मळमळ होणे, पोट दुखणे, उलटी, भूक न लागणे आणि जुलाब लागणे यांचाही समावेश आहे.

काय म्हणाले एक्सपर्ट?

गुडगांवच्या फोर्टिस मेमोरिअल रिसर्च इन्स्टिट्यूटचे डॉक्टर मनोज गोयल यांनी हिंदुस्थान टाइम्सला सांगितलं की, 'काही लोकांना सुरूवातीला सर्दी-पळसा न होता केवळ पोटाची समस्या होऊ शकते. यात पाठदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, भूक न लागणे आणि जुलाब यांचाही समावेश आहे. ओमायक्रॉनमुळे पोटातील वरचा थर म्यूकोसा संक्रमित होतो. यामुळे सूजही येते'. एक्सपर्ट सांगतात की, वॅक्सीनचे दोन डोज घेतलेल्या लोकांनाही पोटासंबंधी ही समस्या होत आहे. ही लक्षणं गंभीर नाहीत आणि चिंतेचीही बाब नाही.

करू नका दुर्लक्ष

एक्सपर्ट सांगतात की, पोटदुखी, मळमळ आणि भूक न लागणे याकडे सामान्य फ्लू सारखं बघू नका. जर तुमच्यात ही लक्षणं असतील तर स्वत:ला लगेच आयसोलेट करा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वत: कोणतीही औषधं घेऊ नका. स्वत:ला हायड्रेट ठेवा, हलका आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या. मसालेदार पदार्थ आणि मद्यसेवन टाळा. 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य