Omicron Symptoms: अभ्यासातून समोर आली ओमायक्रॉनची सर्व २० लक्षणं; जाणून घ्या महत्त्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 12:12 IST2022-01-17T12:12:35+5:302022-01-17T12:12:55+5:30
देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ; ओमायक्रॉन बाधितांचा आकडाही वाढला

Omicron Symptoms: अभ्यासातून समोर आली ओमायक्रॉनची सर्व २० लक्षणं; जाणून घ्या महत्त्वाची माहिती
मुंबई: देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढ होत आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटनं थैमान घातलं आहे. हा व्हेरिएंट अधिक संक्रामक असल्यानं त्याचा प्रसार वेगानं होत आहे. ओमायक्रॉन बाधितांमध्ये विविध स्वरुपाची लक्षणं दिसून येत आहेत. यूकेमधल्या ZOE कोविड अभ्यासातून ओमायक्रॉनची २० लक्षणं समोर आली आहेत. ही लक्षणं किती काळ दिसून येतात, त्याची माहितीदेखील पुढे आली आहे.
ओमायक्रॉनची लक्षणं-
१. डोकेदुखी
२. नाक गळणं
३. थकवा
४. शिंका येणं
५. घशात खवखव
६. सततचा खोकला
७. कर्कश आवाज
८. थंडी वाजणं/हुडहुडी भरणं
९. ताप
१०. भोवळ येणं
११. ब्रेन फॉग
१२. वास न येणं
१३. डोळे दुखणं
१४. मांसपेशींमध्ये वेदना
१५. भूक न लागणं
१६. सुगंध न येणं
१७. छातीत वेदना
१८. ग्रंथींमध्ये सूज
१९. कमजोरपणा
२०. त्वचेवर रॅश येणं
केव्हापर्यंत राहतात ही लक्षणं?
डेल्टाच्या तुलनेत ही लक्षणं वेगानं दिसून येतात. ओमायक्रॉनची लागण झाल्यानंतर २ ते ५ दिवसांमध्ये लक्षणं दिसू लागतात, असं आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं. ताप येणं ही ओमायक्रॉनचं लक्षण आहे. ५ दिवसांपर्यंत ही लक्षणं दिसून येतात, अशी माहिती ब्रिटिश महामारीतज्ज्ञ टिम स्पेक्टर यांनी दिली.
डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनची लक्षणं कमी दिवस राहतात. ५ दिवसांनंतर चाचणी निगेटिव्ह आली असल्यास ५ दिवसांत लक्षणं येऊन गेली, असा होतो. ओमायक्रॉनची लक्षणं जितक्या वेगानं दिसून येतात, तितक्याच वेगानं ती निघूनही जातात. बहुतांश लोकांमध्ये ही लक्षणं ३ ते ५ दिवस दिसतात, असं स्पेक्टर यांनी सांगितलं. लस घेतलेल्या लोकांमध्ये सौम्य स्वरुपाची लक्षणं दिसून येतात. कोरोना लसीचा एकही डोस न घेतलेल्या लोकांमध्ये गंभीर स्वरुपाची लक्षणं दिसतात, असं ते म्हणाले.