ओमायक्रॉनची लागण तरुणांनाच अधिक का? जाणून घ्या याबाबत अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 05:59 PM2021-11-29T17:59:46+5:302021-11-29T18:02:30+5:30

. या विद्यापीठात अनेक विद्यार्थ्यांना लागण झाल्याचे आढळून आले असून विद्यापीठ प्रशासनाने काही परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. हॉटस्पॉट एक अशी जागा आहे जिथे कोविड-19 ची मोठ्या प्रमाणात प्रकरणे नोंदवली जातात.

omicron affects youngsters in south africa | ओमायक्रॉनची लागण तरुणांनाच अधिक का? जाणून घ्या याबाबत अधिक

ओमायक्रॉनची लागण तरुणांनाच अधिक का? जाणून घ्या याबाबत अधिक

Next

दक्षिण आफ्रिकेतील कोविड-19 प्रकरणांच्या वाढीमध्ये शेवाने युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी हे हॉटस्पॉट म्हणून उदयास आले आहे. या विद्यापीठात अनेक विद्यार्थ्यांना लागण झाल्याचे आढळून आले असून विद्यापीठ प्रशासनाने काही परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. हॉटस्पॉट एक अशी जागा आहे जिथे कोविड-19 ची मोठ्या प्रमाणात प्रकरणे नोंदवली जातात.

दक्षिण आफ्रिकेत एवढ्या तरूणांना टोचली लस
शेवणे येथील अधिकारी आता लसीकरणावर भर देत आहेत. विशेषत: तरुणांना लस देण्याकडे अधिक भर असल्याच म्हटलं जात आहे. शेवणे युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीमधील बहुतांश विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले नाही. दक्षिण आफ्रिकेतील १८ ते ३४ वयोगटातील केवळ २२ टक्के लोकांना लसीकरण करण्यात आले आहे

लसीचा डोस घेतलेल्या मनकोबा जिथा या विद्यार्थ्याने सांगितले की, तो सोबतच्या विद्यार्थ्यांनाही असे करण्यासाठी प्रेरित करेन. जिथा म्हणाली, 'मी त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून त्यांनी लस घ्यावी. यामुळे ते कोरोना विषाणूपासून दूर राहू शकतील. साथीच्या रोगामुळे लोक मरत आहेत आणि बाधितांची संख्या वाढत आहे.

दक्षिण आफ्रिकेची सरकार निराश
महामारीला जवळपास दोन वर्षे उलटून गेली आहेत. कोविड-19 च्या नवीन प्रकाराचा संसर्ग रोखण्यासाठी जग धडपडत आहे. ज्याची प्रथम ओळख दक्षिण आफ्रिकेत झाली होती. अनेक देश दक्षिण आफ्रिकेतील प्रवाशांवर बंदी घालत आहेत. जे दक्षिण आफ्रिकेच्या सरकारसाठी निराशाजनक आहे.

जुन्या कोरोनापेक्षा अधिक प्रभावशाली
जागतिक आरोग्य संघटनेने विषाणूच्या नवीन प्रकाराला ओमायक्रॉन असे नाव दिले आहे. जो अत्यंत संसर्गजन्य आहे. त्याचे खरे धोके अद्याप समजलेले नाहीत. डब्ल्यूएचओने म्हटले आहे, की प्राथमिक पुराव्यांवरून असे सूचित होते की ज्यांना आधीच कोविड-19 झाला आहे त्यांना पुन्हा हा आजार होण्याची शक्यता वाढली आहे.

सध्याच्या लसी त्याविरूद्ध कमी प्रभावी आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी काही काळ लागू शकतो. असे असले तरी, गंभीर आजार आणि मृत्यू रोखण्यासाठी ही लस किमान काही प्रमाणात प्रभावी ठरेल अशी काही तज्ज्ञांची अपेक्षा आहे. त्यांनी लोकांना लस घेण्यास प्रोत्साहन देणे सुरू ठेवले आहे.

तरूणाईला Omicron चा धोका अधिक?
डॉक्टरांच्या मते, ओमायक्रॉन संक्रमित व्यक्तीमध्ये लक्षणे सौम्य दिसतात. तज्ञांनी इशारा दिला आहे की, संसर्गाचा प्रारंभिक टप्पा तरुणांमध्ये दिसून आला आहे. जर वृद्ध आणि लसीकरण न केलेले लोक त्याला बळी पडले तर परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. सुरुवातीच्या टप्प्यात, तरुणांना ओमायक्रॉनचा संसर्ग जास्त होत असल्याने, असे म्हणता येणार नाही. तरुणांना कोरोनाच्या नवीन प्रकाराचा इतरांपेक्षा जास्त धोका आहे. शास्त्रज्ञ सध्या Omicron वर संशोधन करत आहेत. ते अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत.

Web Title: omicron affects youngsters in south africa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.