OMG : ‘सेक्स’बाबत पुरुष असतात स्वार्थी, महिलांचा आरोप !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2017 13:36 IST2017-04-15T08:06:10+5:302017-04-15T13:36:10+5:30
सेक्स दरम्यान पुरुष स्त्रीच्या लैंगिक भावनांचा विचार करत नाहीत. फक्त स्वत:पुरता विचार करतात...

OMG : ‘सेक्स’बाबत पुरुष असतात स्वार्थी, महिलांचा आरोप !
महिला आणि पुरुषांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सेक्स. या विषयावर जरी खुले बोलले जात नाही मात्र वेळोवेळी यावर केल्या जात असलेल्या संधोधनातून या विषयावर आणखी प्रकाश टाकला जात आहे. विशेष म्हणजे प्रत्येकवेळी संशोधनातून वेगवेगळ्या दृष्टीकोनातून यावर माहिती समोर येत आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे की, ‘सेक्स’च्या बाबतीत पुरुष स्वार्थी असतात. असे बहुतांश महिलांचे हे मत आहे.
एका वेबसाईटने केलेल्या सर्वेक्षणातून असे जाहीर करण्यात आले आहे की, सेक्सची इच्छा निर्माण झाल्यानंतर शरीससुख मिळवताना पुरुषांमधला स्वार्थीपणा दिसून येतो. सेक्स करताना पुरुषाला जे समाधान हवे असते तेच सुख आपल्या जोडीदाराला मिळाले पाहिजे याची काळजी पुरुषाने घेतली पाहिजे, असे एका अभ्यासातून समोर आले आहे.
या सर्वेक्षणात अनेक महिलांनी पुरुषांवर आरोपही केला आहे, त्या म्हणतात की, ‘सेक्स दरम्यान पुरुष स्त्रीच्या लैंगिक भावनांचा विचार करत नाहीत. फक्त स्वत:पुरता विचार करतात.’ तीन पैकी दोन महिलांनी अशाच पद्धतीचे मत व्यक्त केले. पुरुषांना मात्र हा आरोप मान्य नाही. सेक्स करताना जोडीदाराच्या समाधानाला आपले पहिले प्राधान्य असते, असे पुरुषांनी सांगितले. तर याच अभ्यासात पुरुष केवळ स्वत:चा विचार करतात हा समज चुकीचा असल्याचे पुरुषांनी सांगितले. सेक्स करतानाही अनेक पुरुष आपल्यातील पुरुषी अहंकाराची भावना दाखवून देत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले. योग्य माहिती आणि जोडीदारांमध्ये संवाद यातून ही समस्या सुटू शकते असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.