शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

ओक्युलर मायक्रोबायोलॉजी; अंधत्व दूर सारणारे विज्ञान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 21:05 IST

संसर्गजन्य डोळ्यांच्या अल्सरची बाधा ही जगभरातील सर्वात जास्त होणाऱ्या मृत्युंपैकी पाचवे महत्त्वाचे कारण आहे.

डॉ. सोमशीला मूर्ती

तुम्हाला माहीत आहे का, संसर्गजन्य डोळ्यांच्या अल्सरची बाधा ही जगभरातील सर्वात जास्त होणाऱ्या मृत्युंपैकी पाचवे महत्त्वाचे कारण आहे? दर वर्षाला संसर्गजन्य केराटायटीससारख्या डोळ्यातील आजारामुळे सुमारे १.५ ते २ दशलक्ष रुग्ण एकाडोळ्यातील दृष्टी कायमची गमावतात. डोळ्यातील संसर्गाचे वेळीच निदान झाल्यास रुग्णांना कायमस्वरुपी अंधत्वापासून वाचविता येते. या घातक संसर्गाचे निदान मायक्रोबायल तपासणीतून होते. ही तपासणी वेळीच करणे आवश्यक आहे.

डोळा हा आपल्या शरीरातील सर्वात नाजूक अवयव आहे. हा संवेदनशील अवयव कायमच सूक्ष्मजीवांच्या संपर्कात येत असल्याने त्याला गंभीर स्वरुपातील संसर्ग होऊ शकतो. डोळ्यात संसर्गाची बाधा झाल्यावर तातडीने अचूक निदान गरजेचे असते. अशा वेळी नेत्ररोग तज्ज्ञांकडून ओक्युलर मायक्रोबायोलॉजी तपासणी सुचविली जाते. 

ओक्युलर मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय?डोळ्याच्या संक्रमण ओळखण्यासाठी ओक्युलर मायक्रोबायोलॉजी हे विज्ञान आहे, हे डोळ्याचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करते. ओक्युलर मायक्रोबायोलॉजिस्ट हे डोळ्यांचे विशेषज्ञ डॉक्टर असून ते डोळ्यांतील संक्रमणांची चाचणी करतात. हे डॉक्टर कंजंक्टिव्हिटिस, केराटायटिस आणि एंडोफ्थॅल्मिटिस सारख्या डोळ्यांच्या संक्रमणांची नेमकी कारणे शोधतात. यासाठी ते डोळ्यातील विशेष स्वॅब्स आणि स्क्रॅपिंग्जचा वापर करतात. 

कंजंक्टिव्हिटिस हे संक्रमण डोळ्यांच्या आतील पडद्याला झालेले असते. केराटायटिस आणि एंडोफ्थॅल्मिटिस ही गंभीर संक्रमणे आहेत, जी जलद गतीने पसरतात आणि योग्य उपचार न केल्यास डोळ्यांची दृष्टी कायमस्वरूपी कमी करू शकतात. 

ओक्युलर मायक्रोबायोलॉजी तपासणीत डोळ्यातील संसर्गाच्या बाधेने घातक जीवाणू, बुरशी आणि विषाणू यांचा नेमका कितपत प्रसार झाला आहे, याची नेत्ररोग तज्ज्ञांना अचूक माहिती मिळते. ही तपासणी नेत्ररोग तज्ज्ञांना योग्य उपचार देण्यासाठी मार्गदर्शकठरते. योग्य उपचारांमुळे रुग्ण पटकन बरा होतो. या तपासणीच्या मदतीने संसर्गाचीनेमकी माहिती उपलब्ध होत असल्याने उपचारांत गुंतागुंतही निर्माण होत नाही. 

सार्वजनिक आरोग्य जपाकेराटायटीसमुळे डोळ्यात दीर्घकालीन खुणा राहतात. एंडोफ्थॅल्मिटिसमुळे रुग्णांचीदृष्टी कायमस्वरुपी जाऊ शकते. अल्पकाळातच डोळ्याच्या संसर्गाचा रुग्णांच्याकुटुंबीयांमध्ये, तसेच नजीकच्या माणसांमध्येही प्रसार होतो. हे संक्रमण केवळ दृष्टीला धोक्यात आणत नाही तर जीवनाच्या गुणवत्तेवर देखील परिणाम करते. ओक्युलर मायक्रोबायोलॉजीच्या तपासणीमुळे या संसर्गाचे वेळीच अचूक निदानकेल्यास रुग्णाला आपले डोळे वाचविता येणे शक्य आहे. 

अँटीमायक्रोबायल प्रतिरोधाचा सामना करणेडोळ्यांच्या संसर्गातील उपचाराच्या दरम्यान प्रतिजैविकांचा अतिरिक्त वापर किंवा दुरुपयोग झाल्यास त्याचा घातक परिणाम होण्याची भीती असते. डोळ्यातीलजीवाणू, बुरशी, तसेच विषाणूंमुळे अँटीमायक्रोबायल प्रतिरोध (अँटीमाइक्रोबियल रेझिस्टन्स) निर्माण होतो.  यामुळे तपासणीमध्ये गंभीर स्वरुपातील गुंतागुंत निर्माणहोते. डोळ्यातील स्टेफिलोकोकस ऑरियस आणि स्युडोमोनास एरुगिनोसासारखे जीवाणू उपचारांमध्ये अडथळा निर्माण करतात. हा अडथळा दूर सारण्यासाठीप्रतिजैविकांचे व्यवस्थापन, औषधांचा योग्य प्रमाणात वापर करणे, आजाराचे तत्काळनिदान करणे आणि उपचार प्रभावीपणे सुरु करणे महत्त्वाचे ठरते. 

या अँटीमायक्रोबायल प्रतिकार पद्धतींचे परीक्षण करायला हवे. रुग्णाला योग्य आणिआवश्यक प्रमाणातील प्रतिजैविकांचे सेवन करण्यास देण्यासाठी आरोग्यसेवाकर्मचारी आणि रुग्ण या दोघांनाही जागरुक करायला हवे. या दोन घटकांवर लक्ष केंद्रित केल्यास रुग्णांवरील उपचारांमध्ये चांगले परिणाम दिसतील. भविष्यातीलप्रतिरोधक संक्रमणांचा प्रसार रोखण्यासाठी ही प्रक्रिया गरजेची आहे. 

प्रगत उपचारआता ओक्युलर मायक्रोबायोलॉजी क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर होत असल्यानेडोळ्यांच्या संसर्गाचे निदान जलद आणि अचूक साधणे शक्य झाले आहे. प्रगततंत्रज्ञानाने ओक्युलर मायक्रोबायोलॉजी क्षेत्रात क्रांती घडविली आहे. 

पॉलिमरेज चेन रिॲक्शन (PCR) या तंत्रज्ञानाच्या मदतीने क्लिनिकल नमुन्यांमधीलडीएनए घटकातील सूक्ष्मजीवही सूक्ष्म प्रमाणात शोधले जातात. विशिष्ट प्रकारचेविषाणू, मायक्रोस्पोरिडिया, एटिपिकल बॅक्टेरिया यांसारखे घातक विषाणू शोधणेआता शक्य झाल्याने रुग्णावर अचूक आणि तातडीने उपचार देता येतात. शरीरातील डीएनए आणि आरएनएबद्दल योग्य व प्रमाणित माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी आता ऑक्सफोर्ड नॅनोपोर सिक्वेंसिंग (ONS) हे तंत्रज्ञान वापरले जाते. हे एकाच नमुन्यात एकाच वेळी एकाधिक रोगजनकांचा शोध घेण्याचा आणि अँटीमाइक्रोबियल रेझिस्टन्स जीन्स प्रदान करण्याचा फायदा देते. हे तंत्रज्ञान केराटायटीस, तसेच एंडोफ्थॅल्मिटिससारख्या घातक संसर्ग घटकांवर मात करण्यासाठी सुचविले जाते. या तंत्रज्ञानाच्या मदतीने गमावलेली दृष्टी परतमिळविणेही शक्य झाले आहे. 

या विकसित तंत्रज्ञनातून विज्ञानातील आविष्कारांवर विश्वास ठेवता येतो. विज्ञान केवळ रोगांचे निदान करत नाही, तर रोगातून बरे होण्याचा रामबाण मार्गही देतो, हेआता सिद्ध झाले आहे.  

केराटायटीससारख्या जीवघेण्या संसर्गावर मात करण्यासाठी अचूक आणि वेळेवरसुरु झालेल्या उपचारांमुळे रुग्णांना नवे जीवनदान मिळाल्याच्याही केसेस पाहायलामिळाल्या आहेत. एका वृद्ध व्यक्तीला केरॅटायटिस वाढत असल्याने इतरत्र अनेक उपचारांनंतरही सुधारणा न झाल्याने संदर्भित केले गेले. डोळ्याच्या कॉर्नियाच्या संक्रमित भागातील नमुने घेऊन त्यांची सूक्ष्मजीवशास्त्रीय मूल्यांकन केले गेले. परिणामांमध्ये एकांथामोबा  या दुर्मिळ परंतु धोकादायक पॅरासाईटमुळे होणार्‍या संसर्गाचे निदान झाले, जे गंभीर डोळ्यांचे नुकसान करू शकते. निदानावर आधारित त्वरित वैयक्तिकृत उपचार पद्धत सुरू केली गेली व संसर्ग यशस्वीरित्या सोडवला गेला. रुग्णाला यशस्वी उपचार मिळाले. 

या आव्हानात्मक केसमुळे डोळ्यातील संसर्गावर यशस्वी उपचारासाठी वेळीच निदानआणि उपचारांचे महत्त्व लक्षात येते. डोळ्यांची निगा राखण्यासाठी ओक्युलर मायक्रोबायोलॉजी तपासणी महत्त्वाची भूमिका बजावते. या तपासणीतूनच डोळ्यातील संसर्गाचे अचूक निदान होणे आताशक्य झाले आहे. या तपासणीच्या मदतीने रुग्णाला तातडीने उपचार दिले जातात. परिणामी, रुग्ण कायमस्वरुपी डोळे गमावण्यापासून वाचतो. ओक्युलर मायक्रोबायोलॉजीसारख्या प्रगत वैज्ञानिक संशोधनामुळे आपल्याला डोळ्यांसारख्या अतिशय नाजूक आणि मौल्यवान अवयवाचे संरक्षण करता येते.

(लेखिका शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूटमध्ये वैद्यकीय संचालक आहेत)

टॅग्स :eye care tipsडोळ्यांची निगाHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स