शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

भारतात लठ्ठपणाचा 200 वर्षाच्या ब्रिटिश शासनाशी काय आहे संबंध? रिसर्चमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 11:48 IST

Obesity In India Due To British Rule: लठ्ठपणासाठी चुकीची लाइफस्टाईल, चुकीचं खाणं-पिणं ही मुख्य कारणं मानली जातात. पण आता आणखी एक कारण समोर आलं आहे जे हैराण करणारं आहे.

Obesity In India Due To British Rule:  भारतात मोठ्या प्रमाणात लोक लठ्ठपणाचे शिकार होत आहेत. ज्यामुळे डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर आणि हार्ट डिजीजचा धोका वाढतो. बरेच लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ते जिम आणि डाएट फॉलो करतात. तशी तर लठ्ठपणासाठी चुकीची लाइफस्टाईल, चुकीचं खाणं-पिणं ही मुख्य कारणं मानली जातात. पण आता आणखी एक कारण समोर आलं आहे जे हैराण करणारं आहे.

लठ्ठपणाचं कारण आहे 200 वर्षाची गुलामी

एका रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे की, भारतात लठ्ठपणासाठी सगळ्यात जास्त जबाबदार साधारण 200 वर्ष चाललेलं ब्रिटिश शासन आहे. इंग्रजांनी 1757 ते 1947 पर्यंत देशावर राज्य केलं. यादरम्यान देशात अनेकदा दुष्काळ पडला आणि पूरही आले. इतिहासकारांनुसार, ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नीतिमुळे भारत-पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये एकूण 25 मोठे दुष्काळ पडले ज्यात 6 कोटींपेक्षा जास्त लोकांचा जीव गेला. 

एपिजेनेटिक्समधून धक्कादायक बाबींचा खुलासा

एपिजेनेटिक्स अशी स्टडी आहे ज्यात आपलं बिहेविअर आणि पर्यावरणाचा आपल्या डीएनएवर पडणाऱ्या प्रभावाची माहिती मिळते. एपिजेनेटिक्सच्या सायंटिस्टनुसार, 200 वर्षात अनेकदा दुष्काळ पडल्याने दक्षिण आशियातील लोकांच्या डीएनएमध्ये बरेच बदल झाले. याकारणाने अनेक पीढ्यांदरम्यान भारतीयांचं शरीर भूकेच्या अनुकूल झालं. याच कारणाने लठ्ठपणा, डायबिटीस, हाड ब्लड प्रेशर आणि हार्ट डिजीजचा धोका वाढला.

अमेरिकेच्या मर्सी हेल्थ-स्प्रिंगफील्ज रीजनल मेडिकल सेंटरचे एमडी डॉ. मुबीन सैय्यद यांनी आपला रिसर्च "The Susceptibility of South Asians to Cardiometabolic Disease as a Result of Starvation Adaptation Exacerbated During the Colonial Famines"मध्ये सांगितलं की, दुष्काळात जिवंत राहिलेल्या लोकांच्या येणाऱ्या पिढ्यांमध्ये डायबिटीस आणि हाइपरग्लेसेमियाचा धोका दुप्पट वाढतो.

इंसुलिन सेंसिटिव्हिटी वाढली

डॉ. मुबीन सैय्यद यांच्यानुसार, एशिअन लोकांची बॉडी इन्सुलिन रेसिस्टेंट झाली आहे. यामुळे मसल्स, फॅट आणि लिव्हर सेल्स रक्तातील ग्लूकोजचं एब्जॉर्ब्शन करू शकत नाही आणि एनर्जीसाठी याचा वापर होऊ शकत नाही. ही मेडिकल कंडिशन डायबिटीस आणि लठ्ठपणाचं मोठं कारण ठरते.

टॅग्स :Healthआरोग्यIndiaभारतInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स