जायफळ आहे गुणकारी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 16:06 IST2016-12-21T16:04:26+5:302016-12-21T16:06:38+5:30
स्वयंपाक घरात आरोग्यविषयक समस्यांवर लाभदायक अशा अनेक वस्तू आहेत, ज्या महागड्या उपचारांपेक्षाही तितक्याच गुणकारी ठरतात. त्यापैकी एक म्हणजे जायफळ होय. जाणून घेऊया की काय आहेत जायफळचे फायदे.
.jpg)
जायफळ आहे गुणकारी !
* जायफळ वापरल्याने त्वचेच्या बऱ्याच समस्या दूर होतात. त्यातीलच डोळ्यांखालचा काळेपणा होय. जायफळाची पेस्ट बनवून डोळ्याखाली लावल्याने डोळ्याखालचा काळेपणा कमी होण्यास मदत होते. सर्वप्रथम जायफळाची पेस्ट बनवून डोळ्याखालील काळ्या भागावर लावा. पेस्ट सुकल्यानंतर पाण्याने धुवून घ्या. असे रोज केल्यास डोळ्याखालचे काळे डाग निघून जातील.
* जायफळ गुणधर्माने गरम असल्यामुळे लहान मुलांसाठी हे एक वरदान आहे. थंडीपासून बचावासाठी हिवाळ्यात लहान मुलांना हे दिले जाते. जायफळ मोहरीच्या तेलात मिसळून मुलांना दिले जाते.
* जखमेवरही जायफळ गुणकारी ठरते. यासाठी जखम झालेल्या ठिकाणी तयार झालेले निशाण दूर करण्यासाठी जायफळाचे चूर्ण बनवून मोहरीच्या तेलासोबत लावावे. रोज लावल्याने जखमेचे निशाण नाहीसे होतील.