शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

अरेरे! हँगओव्हर समजून दुर्लक्ष करणं पडलं महागात; महिलेला झाला जीवघेणा आजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 16:03 IST

रात्री पार्टी केल्यानंतर तिला उलट्या झाल्यासारखे वाटले. त्याचवेळी नाकावर आणि चेहऱ्यावर लाल पुरळ उठले. पण तिने सुरुवातीला सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं.

न्यूझीलंडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पॉपी बेगुएली नावाच्या महिलेची तब्येत अचानक बिघडू लागली. रात्री पार्टी केल्यानंतर तिला उलट्या झाल्यासारखं वाटलं. त्याचवेळी तिच्या नाकावर आणि चेहऱ्यावर लाल पुरळ उठले. पण तिने सुरुवातीला सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. रात्री पार्टी केल्याने आणि जास्त मद्यपान केल्यामुळे अंगावर पुरळ उठत असल्याचा विचार करून ती त्याकडे दुर्लक्ष करत होती. मात्र जेव्हा खोकल्यानंतर रक्त येऊ लागले तेव्हा परिस्थिती आणखी बिघडू लागली. 

खोकल्याबरोबर रक्त येत असल्याचे पाहून ती सुरुवातीला थोडी घाबरली. जेव्हा ती डॉक्टरांकडे चेकअपसाठी गेली तेव्हा तिला तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का बसला आणि डॉक्टरांनी तिला कॅन्सर झाल्याचं सांगितलं. यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. टेस्ट केल्यानंतर महिलेला 'हॉजकिन लिम्फोमा' झाल्याचं समोर आलं आहे.

हॉजकिन लिम्फोमा हा एक प्रकारचा कॅन्सर आहे जो बोन मॅरोमध्ये होतो. जो शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा कॅन्सर लिम्फोसाइट्स नावाच्या पांढऱ्या रक्त पेशींवर परिणाम करतो. हॉजकिनच्या लिम्फोमामध्ये, लिम्फ नोड्समध्ये असामान्य लिम्फोसाइट्स (रीड-स्टर्नबर्ग पेशी) तयार होतात. या आजाराचे निदान सामान्यत: टेस्ट करून केलं जातं.

थकवा, अचानक वजन कमी होणे, ताप, रात्री घाम येणे, खाज सुटणे ही हॉजकिन्स लिम्फोमाची लक्षणं आहेत. पॉपी बेगुएली सांगते की, कॅन्सरचं निदान होण्यापूर्वी मित्रांसोबत पार्टी करायची आणि भरपूर दारू प्यायची. थोडी डोकेदुखी होती पण काही वेळाने बरं वाटलं. मग अचानक माझ्या लक्षात आलं की माझी तब्येत बिघडत आहे आणि प्रत्येक वेळी रात्री मला उलट्या झाल्यासारखे वाटू लागलं.  माझ्या संपूर्ण शरीरावर ऍलर्जी झाल्यासारखे वाटलं.

सुरुवातीला डॉक्टरांनी या लक्षणांवर एक्जिमा आणि त्वचारोग म्हणून उपचार केले आणि औषध लिहून दिलं. चुकीच्या औषधामुळे आरोग्यासंबंधी समस्यांना सामोरं जावं लागलं. पुरळ दिवसेंदिवस वाढत गेले आणि माझा चेहरा पूर्णपणे खराब झाला. यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की माझ्या शरीरात दिसणारी लक्षणे कॅन्सरची लक्षणं आहेत. आता उपचार सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यcancerकर्करोग