शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जपानमधील लोकांच्या तुलनेत भारतीयांना लवकर वृद्धत्त्व जाणवू लागतं - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 10:20 IST

भारतात राहणाऱ्या लोकांना जपान आणि स्वित्झर्लॅंडमध्ये राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत लवकर आणि अधिक वृद्धत्व जाणवतं किंवा त्यांना वयासंबंधी समस्यांचा सामना करावा लागतो.

(Image Credit : www.agewellfoundation.org)

भारतात राहणाऱ्या लोकांना जपान आणि स्वित्झर्लॅंडमध्ये राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत लवकर आणि अधिक वृद्धत्व जाणवतं किंवा त्यांना वयासंबंधी समस्यांचा सामना करावा लागतो. सोबत वृद्धत्वाच्या नकारात्मक प्रभावांशीही झगडावं लागतं. पहिल्यांदाच अशाप्रकारच्या करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून हा खुलासा झाला आहे. या रिसर्चमध्ये ग्लोबल बर्डेन ऑफ डिजीजच्या अभ्यासाच्या आकडेवारीचा वापर केला गेला आहे.

सर्वात आणि कमी वयात ३० वर्षांचं अंतर

द लांसेट पब्लिक हेल्थमध्ये प्रकाशित या रिसर्चनुसार, या देशांमध्ये  सर्वाधिक आणि सर्वात कमी वयाच्या लोकांमध्ये जवळपास ३० वर्षांचं अंतर आहे. अभ्यासकांना आढळलं की, सरासरी ६५ वर्षाच्या एखाद्या व्यक्तीला होणाऱ्या वयासंबंधी समस्या आणि जपान-स्वित्झर्लॅंडमध्ये राहणाऱ्या ७६ वर्षाचा एखादा व्यक्ती व पापुआ न्यू गिनीमध्ये राहणाऱ्या ४६ वर्षाच्या व्यक्तीला आरोग्यासंबंधी समस्यांचा स्तर हा समान असतो. विश्लेषणातून हे समोर आलं आहे की, भारतात राहणाऱ्या लोकांना आरोग्यासंबंधी याच समस्या ६० वयापर्यंत येता-येता जाणवू लागतात. 

लोकांचा दीर्घायुषी होणं संधी की धोका?

या अभ्यासाचे मुख्य लेखक आणि अमेरिकेतील यूनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमध्ये पोस्ट डॉक्टोरलची अभ्यासिका एंजेला वाई चांग म्हणाली की, असमान निष्कर्ष हे दाखवतात की, लोकांचं दीर्घायुषी होणं एकतर संधी सारखं असू शकतं किंवा लोकसंख्येच्या समग्र कल्याणासाठी धोका ठरू शकतं. हे वयासंबंधी आरोग्यावर निर्भर करतं. चांग म्हणाल्या की, 'वयासंबंधी आरोग्य समस्या लवकर सेवानिवृत्ती, कमी कार्यक्षम आणि आरोग्यावर अधिक खर्चाचं कारण ठरू शकतात. आरोग्य प्रणालीवर चांगल्याप्रकारे काम करणाऱ्या सरकारी आणि इतर संस्थांनी लोकांना वयासंबंधी नकारात्मक प्रभाव कधीपासून दिसायला लागतो यावर विचार करण्याची गरज आहे.  

टॅग्स :ResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्स