शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रीमध्ये कुणी करू नये उपवास? जे करतील त्यांनी काय काळजी घ्यावी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 10:29 IST

Navratri Fasting Tips : उपवास करणं सगळ्यांसाठीच फायदेशीर नसतं. काही लोकांसाठी उपवास करणं फार घातक ठरू शकतं. तुम्हाला आरोग्यदायक वेगवेगळ्या समस्याही होऊ शकतात.

Navratri Fasting Tips : सध्या नवरात्रीचा उत्सव सुरू झाला आहे. बरेच लोक ९ दिवस उपवास करतात. उपवासादरम्यान अनेक लोक निरंकार उपवास करतात, तर काही लोक एक वेळ जेवण किंवा उपवासाचे पदार्थ खातात. उपवास करून पोटाला काही दिवस आराम देणे फारच चांगलं आहे.

मात्र, उपवास करणं सगळ्यांसाठीच फायदेशीर नसतं. काही लोकांसाठी उपवास करणं फार घातक ठरू शकतं. तुम्हाला आरोग्यदायक वेगवेगळ्या समस्याही होऊ शकतात. अशात तुम्ही आता नवरात्रीमध्ये उपवास करणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. यामुळे तुम्हाला उपवास करताना काळजी घेण्यास मदत मिळेल.  

कुणी करू नये उपवास?

1) डायबिटीसच्या पेशन्ट्ससाठी वेळेवर जेवण करणे, औषध घेणे गरजेचं असतं. अशात त्यांनी जर उपवास करून शरीराची उपासमार केली तर त्यांना त्याचा मोठा फटका बसू शकतो.

2) हाय ब्लड प्रेशर म्हणजे हाय बीपीच्या रूग्णांनी जर उपवास केला तर त्यांचं बॉडी सिस्टम बिघडू शकतं. उपवास केल्याने त्यांना अधिक त्रास होण्याची शक्यता अधिक असते.

3) नुकतीच ज्या रूग्णांची सर्जरी झाली आहे, त्यांनीही उपवास करू नये. सर्जरी झाल्यानंतर जखम सुकण्यासाठी बॉडीला आवश्यक व्हिटॅमिन आणि मिनरल्सची गरज असते.

4) ज्या लोकांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता आहे त्यांनी उपवास करू नये. उपवास केल्यास अशांना शरीरात कमजोरी आणि थकवा अधिक जाणवू शकतो.

5) हार्टच्या पेशन्टना खाण्या-पिण्यावर जास्त लक्ष द्यावं लागतं. जर ते जास्त वेळ उपाशी राहिले तर त्यांच्या शरीराचं सिस्टम बिघडू शकतं.

6) ज्या लोकांना फुफ्फुसामध्ये काही त्रास असेल तर त्यांनीही उपवास करू नये. याने त्रास अधिक वाढू शकतो.

7) गर्भवती महिलांना सतत व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची गरज असते. जर यादरम्यान त्यांनी उपवास केला तर अशाने माता आणि तिच्या बाळावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

8) स्तनपान करणाऱ्या महिलांनीही उपवास करू नये. यामुळे मुलांना आवश्यक ते व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळत नाहीत. याचा मुलांच्या वाढीवर वाईट परिणाम होण्याची शक्यता अधिक असते.

काय खाऊ नये?

तळलेले पदार्थ खाऊ नका

उपवासादरम्यान जास्तीत जास्त लोक तळलेले पदार्थ सेवन करतात. पण हे नुकसानकारक ठरू शकतं. अशात राजगीऱ्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे उपवास केला असल्यास याचा डाएटमध्ये समावेश करावा. त्यासोबतच साबुदाणा सुद्धा उपवास करताना खाऊ शकता. दिवसातून केवळ एकदाच काही खाणे टाळा. याने अॅसिडिटी आणि उलटी होऊ शकते. 

पौष्टीक आहार घ्या

डाएटमध्ये अचानक मोठा बदल झाल्याने शरीरावर प्रभाव पडतो. त्यामुळे जे काही खाल त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग करणे गरजेचे आहे. कमी तेलाचे पदार्थ खावे. तसेच दिवसभर हलकं काहीतरी खात रहावं. तसेच भरपूर पाणी प्यावे.

ज्यूसने शरीर ठेवा हायड्रेट

उपवास दरम्यान शरीराची काळजी घेणे फार गरजेचे आहे. तुम्हाला हवं असेल तर हेल्दी ज्यूसचं सेवन करा. व्हिटॅमिन ए, बी आणि सी असलेली फळे आणि भाज्यांचा ज्यूस तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक तसेच हेल्दी वाटेल. 

चहा-कॉफी टाळा

उपवास केला असताना चहा किंवा कॉफी घेणे टाळा कारण या दोन्हीमध्ये कॅफीन असतं. याने शरीर स्ट्रेस्ड होतं. तसेच याने झोपण्याची रोजची पद्धतही प्रभावित होते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य