खुशखबर! देशात कोरोना लसीकरणाची जोरदार तयारी सुरू; पुढच्या आठवड्यात ४ राज्यात होणार ड्राय रन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 03:22 PM2020-12-25T15:22:26+5:302020-12-25T15:35:23+5:30

CoronaVirus News & Latest Updates : पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश आणि गुजरात या राज्यांची निवड करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात या राज्यात कोरोना लसीकरण ड्राई रन करण्यात येईल.

National government gearing up for roll out of covid19 vaccine across the country four states will conduct dry run for vaccine-2 | खुशखबर! देशात कोरोना लसीकरणाची जोरदार तयारी सुरू; पुढच्या आठवड्यात ४ राज्यात होणार ड्राय रन

खुशखबर! देशात कोरोना लसीकरणाची जोरदार तयारी सुरू; पुढच्या आठवड्यात ४ राज्यात होणार ड्राय रन

Next

सरकारने देशात कोरोना व्हायरसविरूद्ध लसीकरणासाठी तयारीला सुरूवात केली आहे. भारत सरकारने दिलेल्या माहितीनुसार कोरोना लस देण्याआधी त्याचे ड्रायरन केलं जाणार आहे. केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार ड्राय रनसाठी चार राज्यांची निवड करण्यात आली आहे. पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश आणि गुजरात या राज्यांची निवड करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात या राज्यात कोरोना लसीकरण ड्राई रन करण्यात येईल.

चाचणी म्हणून कोरोना लसीकरण सुरू करण्यासाठी येथे निर्धारित पद्धती तपासल्या जातील. पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश आणि गुजरात या दोन जिल्ह्यांत लस ड्राय रन चाचण्या घेण्यात येतील. कोरोना लस  ड्राय रनच्या मदतीने लसीकरणासाठी आवश्यक संपूर्ण तयारी केली जाणार आहे. या कालावधीत कोणत्याही व्यक्तीला कोणतीही लस दिली जाणार नाही परंतु लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया पाहिली जाणार आहे.

देशात कोरोना लस देणं सुरू करण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. भारत सरकारकडून असे म्हटले आहे की आजपर्यंत सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये 7००० हून अधिक जिल्हास्तरीय प्रशिक्षणार्थींच्या सहभागाने कोरोना लसीकरणाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. लक्षद्वीपमध्ये हे प्रशिक्षण अद्याप झाले नसून 29 डिसेंबरला लवकरच हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. 

ड्रायरनमध्ये कसं काम केलं जाणार?

कोरोना लसीचे ड्राय रन करताना कोणाला लस दिली जाणार आणि सुरूवातीला कोणाला लस मिळणार नाही. याचा डेटा घेतला जाणार आहे. सरकारकडून cowin एपवरद्वारे माहिती अपलोड केली जाणार आहे.  सरकारने असे म्हटले आहे की जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा पहिल्या टप्प्यात सुमारे ३०० दशलक्ष लोकांना लस दिली जाईल. प्रथम ही लस कोणाला दिली जाईल. हे देखील निश्चित करण्यात आले आहे. सर्व प्रथम  एक गंभीर आजार असलेले लोक, आरोग्यसेवेतील कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी आणि 50 वर्षांवरील लोकांचा यात समावेश असणार आहे.

Web Title: National government gearing up for roll out of covid19 vaccine across the country four states will conduct dry run for vaccine-2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.