National Dental Day | दात निराेगी असतील तर शरीराचे आराेग्य अबाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 04:52 PM2023-03-06T16:52:23+5:302023-03-06T16:54:14+5:30

दातांचे आराेग्य सुदृढ राखणे गरजेचे....

National Dental Day If the teeth are healthy, the health of the body is intact | National Dental Day | दात निराेगी असतील तर शरीराचे आराेग्य अबाधित

National Dental Day | दात निराेगी असतील तर शरीराचे आराेग्य अबाधित

googlenewsNext

पुणे : मानवी शरीर ही एक अतिशय गुंतागुंतीची रचना आहे. माणसाच्या सर्व अवयवांचे कार्य हे शरीराच्या एक-दुसऱ्यांच्या कार्यावर अवलंबून असते. त्यापैकीच ताेंडातील दात हा देखील एक अवयव असून, त्याचे आराेग्य बिघडल्यास त्याचे परिणाम इतर अवयवांवरही हाेतात. आजारी दात आणि हिरड्या यांचा संबंध मधुमेह आणि हृदयविकार यांसारख्या दुर्दर आजारांशी आहे. यामुळे दातांचे आराेग्य सुदृढ राखणे गरजेचे आहे, अशी माहिती एमडीएस व प्राेस्थाेडाेंटिक्स डाॅ. राेहन जमेनिस यांनी दिली.

दातांच्या व माैखिक आराेग्याबाबत जागृती करण्यासाठी दरवर्षी ६ मार्च हा राष्ट्रीय दंत दिवस म्हणून पाळला जाताे. दिवसातून दोन वेळा (उठल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी) फ्लोराईड टूथ पेस्टने दात घासावेत. तसेच फ्लॉस किंवा प्रॉक्साब्रश वापरून दातांच्यामधील स्वच्छता करणे, कडक किंवा द्रव पदार्थ खाल्ल्यानंतर योग्य प्रकारे स्वच्छता करणे आणि हिरड्यांचा मसाज करणे या मूलभूत स्वच्छता आवश्यक आहेत.

दंतपोकळ्यांचे म्हणजेच कॅव्हिटीजचे निदान आणि उपचार सुरुवातीच्या टप्प्यावरच केल्यास दात आणि हिरड्यांमधील संक्रमण टाळले जाते. जर संसर्गामुळे तुमचे दात किडले असतील, तर रूट कॅनाल उपचार सहजपणे आणि निश्चितपणे बरे करू शकतात. त्याचप्रमाणे हिरड्यांच्या गंभीर स्वरूपाच्या संसर्गावरदेखील हिरड्यांच्या शस्त्रक्रिया आणि प्रगत उपचार केले जाऊ शकतात, अशी माहिती ही डाॅ. जमेनिस यांनी दिली.

वेदनामुक्त उपचार

सध्या दंतशल्यचिकित्सांची वाढलेली कौशल्ये, साहित्य आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे या सर्व प्रक्रिया तुलनेने वेदनामुक्त झाल्या आहेत. योग्य उपचार आणि काळजी घेऊन काढता येऊ शकणाऱ्या दातांशिवाय तुम्हाला जीवन जगणे शक्य आहे.

मुलांच्या दातांकडे लक्ष द्या

मुलांच्या दातांच्या समस्यांवर लक्ष ठेवले पाहिजे. पुढील आयुष्यातील गुंतागुंतीच्या समस्या टाळण्यासाठी त्यांना लहान वयातच दंतवैद्यांकडे नेले पाहिजे. गरज पडल्यास दुधाच्या दातांमध्ये फिलिंग आणि रूट कॅनॉल करून घ्यावे. जर ते वाकडे किंवा अयोग्य स्थितीत असतील तर क्लिप, ब्रेसेस किंवा अलाइनर उपाय देऊ शकतात. आजकाल प्रगत डिजिटल तंत्रज्ञान आणि मेटल फ्री सिरॅमिक व्हीनियर्स आणि क्राउन्सद्वारे स्माईल करेक्शन उपचार करता येतात.

दर ६ महिन्यांनी दंतचिकित्सकाला भेट देणे किंवा वर्षातून किमान एकदा दातांची साफसफाई केल्याने तुम्ही रोगमुक्त राहू शकता. यामुळे दातांच्या समस्या लवकर समजल्याने त्यावर योग्य उपचार पुढील समस्या टळू शकतात. योग्य चावण्याच्या प्रक्रियेसह चांगली मौखिक स्वच्छता ही चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे.

- डाॅ. राेहन जमेनिस, एमडीएस व प्राेस्थाेडाेंटिक्स

Web Title: National Dental Day If the teeth are healthy, the health of the body is intact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.