शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यासाठी हानिकारक आहेत प्रमाणापेक्षा जास्त मल्टी-व्हिटॅमिन्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 11:02 IST

आरोग्याचा विषय येतो तेव्हा मल्टी-व्हिटॅमिन्सला आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. जेव्हा शरीरात आवश्यक तत्व आणि व्हिटॅमिन्सची कमतरता असेल, तेव्हा मल्टी-व्हिटॅमिन्स माध्यामातून ही कमतरता पूर्ण केली जाते.

आरोग्याचा विषय येतो तेव्हा मल्टी-व्हिटॅमिन्सला आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. जेव्हा शरीरात आवश्यक तत्व आणि व्हिटॅमिन्सची कमतरता असेल, तेव्हा मल्टी-व्हिटॅमिन्स माध्यामातून ही कमतरता पूर्ण केली जाते. पण आता एका रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, मल्टी-व्हिटॅमिन्समुळे हृदयासंबंधी आजारांचा धोका वाढतो. 

जर्नल ऑफ अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या शोधानुसार, जेव्हा हृदयासंबंधी आजारांना दूर करण्याचा विषय येतो, तेव्हा एकतर औषधांचा प्रभाव कमी होतो किंवा ते निरुपयोगी ठरतात. तसेच काही हृदयासंबंधी आजारांचा धोकाही वाढतो.  डॉक्टरांचं मत आहे की, या निष्कर्षांचा भारतावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडणार आहे. कारण गेल्या काही वर्षात भारतात हेल्थ सप्लिमेंटचा वापर अनेक टक्क्यांनी वाढला आहे. इथे एकतर स्वत:च्या मनाने हेल्थ सप्लिमेंट घेतात नाही तर डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतात. 

२०१२ मधील एका आकडेवारीनुसार, अमेरिकेत ५२ टक्के लोकसंख्या सप्लिमेंट घेतात. ३१ टक्के लोकसंख्या मल्टी-व्हिटॅमिन घेतात तर १९ टक्के लोक हे व्हिटॅमिन डी, तसेच १४ टक्के लोक कॅल्शिअम आणि १२ टक्के लोक व्हिटॅमिन सी घेतात. 

कॅन्सर आणि न्यूट्रिशनबाबत माहितीवर अभ्यास करणारी यूरोपियन प्रॉस्पेक्टिव इन्वेस्टिगेशन कंपनीच्या आकडेवारीनुसार, ही बाब समोर आली आहे की, तेथील लोकही सप्लिमेंट घेतात. जसे की, डेनमार्कमध्ये ५१ टक्के पुरुष तर ६६ टक्के महिला सप्लिमेंटचं सेवन करतात.

तज्ज्ञ सांगतात की, सप्लिमेंट सहजपणे मेडिकल स्टोर किंवा केमिस्ट काऊंटरवर मिळतात आणि भरपूर प्रमाणात मिळतात. त्यामुळे लोकांना वाटतं की, हे त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या लोकांच्या याच भावनांचा फायदा घेतात. लोकांना विश्वास दिला जातो की, जर त्यांनी मल्टी-व्हिटॅमिन्स घेतले तर त्यांना थकवा जाणवणार नाही आणि ते फिट राहतील. रिपोर्ट्सनुसार, भारतात nutraceutical industry म्हणजे हेल्थ सप्लिमेंट तयार करणाऱ्या इंडस्ट्रीचा बिझनेस साधारण २.२ मिलियन डॉलरचा आहे. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स