शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
2
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
3
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
4
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
5
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
6
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
8
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
9
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
10
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
11
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
12
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
14
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
15
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
16
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
17
Vijay Mallya : 'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
18
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
19
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?

खिशातल्या नाण्यांना समजू नका 'चिल्लर'; ते आहे आजारांचं माहेरघर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 10:22 IST

खिशातल्या नाण्यांवरील किटाणू, बुरशीमुळे त्वचारोगांसह विविध आजारांचा धोका

ठळक मुद्देनाण्यांमुळे अ‍ॅलर्जी आणि त्वचेशी संबंधित विविध आजार होण्याची शक्यतारोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना सर्वाधिक धोकाएमएस विद्यापीठाच्या पर्यावरण अभ्यास विभागाचं संशोधन

वडोदरा: दैनंदिन आयुष्यात आपण अनेक व्यवहारांसाठी नाण्यांचा वापर करतो. मात्र या नाण्यांमुळे आरोग्याला मोठा धोका असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. एका हातातून दुसऱ्या हातात जाणाऱ्या नाण्यांमुळे अ‍ॅलर्जी आणि त्वचेशी संबंधित विविध आजार होऊ शकतात. एमएस विद्यापीठाच्या पर्यावरण अभ्यास विभागानं केलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे. नाण्यांवर विविध प्रकारची बुरशी असते. त्यामुळे अनेक रोग होण्याची शक्यता वाढते, असं संशोधन सांगतं. 'आमच्या विद्यार्थ्यांनी जवळपास १०० नाण्यांचा अभ्यास केला. यापैकी ३ नाणी सोडल्यास बाकीच्या सर्व नाण्यांवर विविध प्रकारचे किटाणू आणि बुरशी पाहायला मिळाली. या नाण्यांवर १२ प्रकारच्या बुरशी दिसून आल्या,' अशी माहिती प्राध्यापक अरुण आर्य यांनी दिली. एमएस विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी संशोधनासाठी लोखंड, क्रोमियम, तांब, निकेल, जस्त या धातूंची नाणी वापरली होती. नाण्यांवर ऐस्परगिलस निगर आणि पेनिसिलियम सिम्पलिसिसिमम अशा दोन प्रकारच्या बुरशी सर्वाधिक आढळून आल्याचं अरुण आर्य यांनी सांगितलं. याशिवाय नाण्यांवर फ्युजेरियम, रिजोपस आणि अल्टरनेरिया एसपीपी या बुरशीदेखील सापडल्या. यापैकी ऐस्परगिलस निगर बुरशीपासून जैविक रसायन तयार होतं. यामुळे नाण्याच्या पृष्ठभागाची झीज होऊन त्वचा आजार उद्भवण्याचा धोका वाढतो. नाण्यांवरील बुरशी आणि किटाणूंचा सर्वाधिक धोका रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना असतो. याशिवाय कर्करोग, क्षयरोगाचा सामना करत असलेल्या, रोगप्रतिकार शक्ती कमी असूनही अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या व्यक्तींनादेखील नाण्यांवरील बुरशीमुळे विविध प्रकारच्या शारीरिक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. बुरशी अशा व्यक्तींच्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचल्यास आणि तिथे तिची वाढ होऊ लागल्यास फुफ्फुसांवर अतिशय प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. 

टॅग्स :Healthआरोग्य