शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Omicron Vaccine: भारतात ओमायक्रॉनवर आली अशी वॅक्सिन जी इतर आजारांवरही ठरणार प्रभावी, तज्ज्ञांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 15:10 IST

केंद्र सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही लस mRNA वर आधारित आहे. हे तंत्र कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचं आढळून आलंय.

गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाविरोधात लढा देतोय. दरम्यान कोरोनाच्या या लढाईत भारताने अजून एक मोठं पाऊल उचललं आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंट विरोधात लस तयार करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही लस mRNA वर आधारित आहे. हे तंत्र कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचं आढळून आलंय.

निती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी सांगितलं की, "आम्ही (Gennova) जेनोव्हाच्या mRNA आधारित लसीवर लक्ष ठेवून आहोत. ही लस पूर्णपणे स्वदेशी आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासही सोपी आहे. तसंच ही सामान्य तापमानातही सुरक्षित राहू शकते."

अमेरिकेमध्ये उपलब्ध असलेल्या इतर mRNA आधारित लसींप्रमाणे याला अतिरिक्त थंड तापमानाची आवश्यकता नाही. गरज भासल्यास, नवीन कोरोना व्हेरियंटशी लढा देण्यासाठी त्यात बदल आणि अपग्रेड केले जाऊ शकतात, असंही डॉ. पॉल यांनी सांगितलंय.

डॉ. पॉल यांच्या सांगण्यानुसार, Gennova जी लस तयार करतेय त्याची चाचणी सध्या सुरु आहे. लवकरच याच्या अंतिम चाचण्या होतील. दरम्यान, कंपनीने ओमायक्रॉन व्हेरिएंटचाव विचार करता मूळ लसीमध्ये आवश्यक बदलही केले आहेत. म्हणजेच कंपनीने समांतरपणे दोन कोरोना लस विकसित केल्या आहेत. एका भारतीय कंपनीने हे यश मिळवणं ही अभिमानाची बाब आहे.

mRNA वर आधारित लस ही केवळ सध्याच्या परिस्थितीत नव्हे तर भविष्यातही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण केवळ ओमायक्रॉनच नव्हे तर मलेरिया आणि डेंग्यूसारख्या आजारांवर प्रभावशाली असणार आहे, असं डॉ. पॉल यांनी सांगितलं.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसOmicron Variantओमायक्रॉन