मृणाल म्हणतेय.... मराठी सिनेमाने ग्लोबल व्हावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2016 00:03 IST2016-03-07T07:03:49+5:302016-03-07T00:03:49+5:30
सोनेरी जादुई छडी हातात घेऊन सोनपरी म्हणुन रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी, अगदी लहान मलांची सुद्धा फेव्हरेट अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी. मृ
.jpg)
मृणाल म्हणतेय.... मराठी सिनेमाने ग्लोबल व्हावे
मराठी चित्रपट ग्लोबल झाले पाहीजेत. आपले चित्रपट जर जगभरातील प्रेक्षकांनी पहावे असे आपल्याला वाटत असेल तर त्याला जागतिक रुप येणे महत्वाचे आहे. आपण सिनेमांचे मार्केर्टिंग जागतिक पातळीपर्यंत करणे आवश्यक आहे. आज युट्युब, इंटरनेटच्या माध्यामातून सिनेमा ग्लोबल होतोय, आंतराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचतोय. परंतू सिनेमा जगभरात पोहचण्यासाठी आपण नक्कीच अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
मराठी चित्रपटांमधील विषय हे नक्कीच वेगळे असतात. त्यामुळे प्रेक्षकवर्ग देखील विखुरला गेला एहे. परंतू आपला मराठी रसिक हे क्लास आणि मास मध्ये नाही अडकले. आपल्या मराठी नाटक आणि सिनेमांना वेगळी परंपरा आहे. नाटक अन सिनेमांचे विषय हे वेगवेगळे आहेत. त्यामुळे प्रेक्षक त्यांना काय आवडतेय तेच पाहतात. मराठी आॅडियन्स हा नक्कीच क्लास आणि मास मध्ये त्याकरीताच अडकलेला नाही.
ग्रामीण भागात एकतर थिएटर्सची उपलब्धता कमी आहे. त्या समस्येवर आपण विचार करायला पाहिजे. खेड्या-पाड्यात ग्रामीण भागात सिनेमा पोहचवायचा तर तो दाखविणार कु ठे हा प्रश्न आहेच. शिवाय ग्रामीण भागातील प्रेक्षकांची टेस्ट बदलणे गरजेचे आहे. त्यांना वेगळ््या विषयांवरील चित्रपट अपेक्षित असतात. परंतू आता बदलत्या काळानूसार मराठी सिनेमा बदलतोय अन वेगळे विषय आपल्याक डे येत आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण प्रेक्षकही चेंज होताना दिसतात. त्यामुळे आता सिनेमा ग्रामीण भागातही लवकरच पोहचेल यात शंका नाही.
एकाच वेळी मराठी इंडस्ट्रीमध्ये चार ते पाच सिनेम रिलिज होतात हे खरे आहे. परंतू या गोष्टीला आपण काहीच करु शकत नाही. प्रत्येकालाच असे वाटते की आपण सिनेमा करावा. मग ज्यावेळी रिलिजिंग ची डेट येते त्यावेळी कोणीच मागे हटत नाही. प्रेक्षकांना स्वत:ची चॉईस असते त्यातला कोणता सिनेमा पहायचा. आज आपल्याकडे एवढे न्युजपेपर आहेत कि त्यातले मला जे वाचण्यास योग्य वाटतात तेच चार पेपर मी वाचते. तसेच सिनेमांचे देखील आहे. परंतू चित्रपट रिलिझिंगचा हा प्रश्न कुठेतरी कंट्रोल झाला पाहीजे.
चित्रपटसृष्टी हिंदी असो किंवा मराठी त्यातील प्रत्येकानेच एकमेकांकडुन काहीतरी शिकायला पाहिजे. कोणत्या इंडस्ट्रीमध्ये काय चालु आहे यासाठी आपले कान, डोळे उघडे असले पाहीजेत. मला असे वाटते सगळ््यांनीच सगळ््यांकडुन सारे काही शिकावे. आज आपली मराठी चित्रपटसृष्टी बदलत आहे. ग्लोबल होत आहे. त्यामुळे मी अस म्हणीन कि बॉलीवुडने देखील मराठी चित्रपटसृष्टीकडुन नक्कीच काहीतरी शिकावे.