#Bestof2018 : २०१८ मध्ये गुगलवर सर्वात जास्त सर्च केले गेले 'हे' आजार!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 10:18 AM2018-12-27T10:18:45+5:302018-12-27T10:25:05+5:30

इंटरनेटचा वापर आता लोक वेगवेगळ्या गोष्टींची माहिती घेण्यासाठी करु लागले आहेत. आपल्यापैकी कितीतरी लोक आजारी पडल्यावर गुगलकरुन आजाराची माहिती, लक्षणे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.

Most searched health keywords on google in 2018 | #Bestof2018 : २०१८ मध्ये गुगलवर सर्वात जास्त सर्च केले गेले 'हे' आजार!

#Bestof2018 : २०१८ मध्ये गुगलवर सर्वात जास्त सर्च केले गेले 'हे' आजार!

इंटरनेटचा वापर आता लोक वेगवेगळ्या गोष्टींची माहिती घेण्यासाठी करु लागले आहेत. आपल्यापैकी कितीतरी लोक आजारी पडल्यावर गुगलकरुन आजाराची माहिती, लक्षणे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा तर गुगलवर माहिती घेतल्यावर गंभीर आजाराची लक्षणेही कळतात. याने व्यक्ती चुकीचं पाऊल उचलून आपला जीव धोक्यात टाकू शकतो. त्यामुळेच आरोग्यतज्ज्ञ इंटरनेटवर हेल्थ आणि मेडिकल सल्ले घेण्यास मनाई करतात. असे असले तरी लोक त्यांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी गुगलची मदत घेतात. २०१८ मध्येही लोकांनी इंटरनेटची अशीच मदत घेतली. २०१८ मध्ये लोकांनी सर्वात जास्त कोणत्या आजारांबाबत सर्च केलं जाणून घेऊया...

कर्करोग

२०१८ मध्ये भारतात गुगलवर सर्वात जास्त सर्च केला गेलेला कीवर्ड होता कर्करोग म्हणजेच कॅन्सर. याचं कारण या वर्षात अभिनेता इरफान खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा आणि अभिनेत्री नफीसा अली हे सेलिब्रिटी कर्करोगाच्या जाळ्यात अडकले आहेत. या लोकांना कर्करोग झाल्याची माहिती मिळताच लोकांनी गुगलवर या रोगासंबंधी माहिती सर्च करणे सुरु केले होते. 

ब्लड प्रेशर

भारतात कर्करोगानंतर सर्वात जास्त सर्च केला गेलेला आरोग्यासंबंधी कीवर्ड होता ब्लड प्रेशर. तुम्हाला हे वाचून धक्का बसेल की, भारतातील प्रत्येक ३ पैकी एक व्यक्ती हायपरटेंशनने पीडित आहे. कदाचित त्यामुळेच ब्लड प्रेशरही भारतात जास्त सर्च केलं जात आहे. 

डायबिटीज

भारत जगातलं डायबिटीज कॅपिटल म्हणून ओळखलं जातं. त्यामुळेच २०१८ मध्ये टॉप सर्च कीवर्डमध्ये डायबिटीजचा समावेश आहे. भारतात दिवसेंदिवस डायबिटीजच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. एका आकडेवारीनुसार सध्या भारतात ५ कोटींपेक्षा अधिक लोकांना टाइप-२ डायबिटीज झाला आहे. 

टायफाइड

गुगलवर २०१८ मध्ये सर्च केल्या गेल्या आजारांमध्ये टायफाइडचाही समावेश आहे. या आजारामुळे दरवर्षी १ लाख २८ हजार ते १ लाख ६१ हजार लोकांना आपला जीव गमवावा लागता आहे. टायफाइडपासून बचाव करण्यासाठी आणि रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी डिसेंबर २०१७ पासून WHO ने एका नवीन वॅक्सीनला मंजूरी दिली होती. 

डेंग्यू

गेल्या काही वर्षात भारतात डेंग्यू या आजाराने थैमान घातलं आहे. त्यामुळेच या आजाराबाबतही गुगलवर सर्वात जास्त सर्च करण्यात आलं. तसं तर गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी डेंग्यूचा कहर जरा कमी होता. तरी सुद्धा भारतात २०१८ मध्ये डेंग्यूच्या साधारण १० हजार केसेस समोर आल्या होत्या.

मानसिक आरोग्य(सायकॉलॉजी)

(Image Credit : The Irish Times)

मेंटल हेल्थबाबत वाढलेली जागरुकता आणि जिज्ञासा यामुळे २०१८ च्या हेल्थ टॉप सर्चमध्ये सायकॉलॉजी कीवर्डचा समावेश आहे. ही एक चांगली बाब असून याने सायकॉलॉजीबद्दल जागरुकता वाढण्यास मदत होईल.

इन्सॉम्निया

पुरेशी झोप न घेणे याला इन्सॉम्निया असं म्हटलं जातं. नुकत्याच जाहीर झालेल्या एका माहितीनुसार, जवळपास ९३ टक्के भारतीय पुरेशी झोप न मिळणे या समस्येशी लढत आहेत. म्हणजे ९३ टक्के भारतीय असे आहेत जे ८ तासांची झोप घेऊ शकत नाहीयेत. त्यामुळे इन्सॉम्निया हा शब्द २०१८ मध्ये सर्वात जास्त सर्च केला गेला.

काही दुसरे आजार

वरील आजारांसोबतच कॉन्स्टिपेशन, डायरीया, मलेरिया, चिकनगुनिया, एचआयवी-एड्स आणि डिप्रेशन या आजारांबाबतही २०१८ मध्ये माहिती सर्च करण्यात आली.  
 

Web Title: Most searched health keywords on google in 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.