महिलांमध्ये हार्ट अटॅकचा धोका वाढतोय, जाणून घ्या कारणे आणि लक्षणे!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 10:45 AM2019-10-08T10:45:13+5:302019-10-08T10:57:10+5:30

तरूण महिलांमध्ये हार्ट डिजीज म्हणजेच हृदयासंबंधी आजारांचं प्रमाण अधिक वाढत आहे. तरूण पुरूषांमध्येही हृदयरोगांचं प्रमाण वाढत आहे.

More young female are prone to heart diseases, We must know why | महिलांमध्ये हार्ट अटॅकचा धोका वाढतोय, जाणून घ्या कारणे आणि लक्षणे!

महिलांमध्ये हार्ट अटॅकचा धोका वाढतोय, जाणून घ्या कारणे आणि लक्षणे!

Next

(Image Credit : vitalchoice.com)

वयाने जास्त असलेल्या महिलांमध्ये हार्ट डिजीज म्हणजेच हृदयासंबंधी आजारांचं प्रमाण अधिक वाढत आहे. तरूण पुरूषांमध्येही हृदयरोगांचं प्रमाण वाढत आहे. पण पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये हृदयरोगांचं प्रमाण अधिक वाढत असल्याचं एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. २०१४ ते २०१६ दरम्यान एसआरएल डायग्नोस्टिक्स द्वारे भारतात करण्यात आलेल्या एका सर्व्हेनुसार, भारतातील तरूण महिलांमध्ये हृदयरोगाचा धोका फार जास्त आहे.

या सर्व्हेमध्ये समोर आले की, भारतात जवळपास ५० टक्के महिलांमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण असामान्य राहतं. कोलेस्ट्रॉल असामान्य राहणं हा हृदयरोगाचं एक संकेत आहे. या सर्व्हेमध्ये सहभागी महिलाचं सरासरी वय ४० वर्ष होतं. ४० वयात हार्ट अटॅक आणि हार्ट फेलिअरचा धोका जास्त असणं धोक्याची घंटा आहे.

(Image Credit : heart.org)

भारतात हार्ट डिजीजमुळे महिलांचा मृत्यू सर्वात जास्त होतो. हृदयरोगाचा धोका महिलांमध्ये मेनोपॉजनंतर अनेक पटीने वाढतो. जर महिला धुम्रपान, अल्कोहोल, सॅच्युरेडेट फॅटसारख्या सवयींचे शिकार असेल तर धोका अधिक वाढतो. तसेच अ‍ॅक्टिव लाइफ न जगणाऱ्यांमध्येही हृदयरोगांचा धोका सर्वात जास्त असतो.

महिलांमध्ये हृदयरोगांचं प्रमुख कारण

(Image Credit :c-hit.org)

हृदयरोगांची लक्षणे आणि कारणं महिला-पुरूषांमध्ये समान रूपाने असतात. पण काही कारणं अशीही असतात, जी महिलांच्या हृदयाच्या आरोग्यावर जास्त प्रभाव टाकतात. उदाहरणार्थ धुम्रपानाचा प्रभाव महिलांच्या हृदयाच्या आरोग्यावर जास्त पडतो. धुम्रपानाचं चलन तरूणांमध्ये अधिक असतं. धुम्रपान केल्याने हृदयाच्या धमण्यांवर वाईट प्रभाव पडतो आणि हार्ट अटॅकचा धोका अनेक पटीने वाढवतो. त्यासोबतच हार्ट अटॅकचं दुसरं सर्वात मोठं कारण म्हणजे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे आहे.

(Image Credit : healthywomen.org)

पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये हार्मोनल बॅलन्स जास्त प्रभाव टाकतो. खासकरून मेनोपॉजनंतर त्यांच्यात हृदयरोगाचा धोका अधिक जास्त वाढतो. हार्मोन्समध्ये बदल झाल्यामुळे महिलांमध्ये हृदयरोगांचा धोका पुरूषांच्या तुलनेत अधिक असतो. महिलांमध्ये हृदयरोगांचा धोका अधिक तेव्हा वाढतो जेव्ह श्वास घेण्यास त्रास होतो आणि हातांमध्ये होणाऱ्या वेदनेकडे दुर्लक्ष केलं जातं. 

तरूण महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे

अनेकदा महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे पुरूषांच्या तुलनेत फार वेगळी असतात. सर्कुलेशन जर्नलमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, ५५ पेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये हृदरोगांची लक्षणे लिंगानुसार वेगवेगळी असू शकतात.

या रिसर्चमध्ये असं आढळून आलं होतं की, हृदयरोगाची लक्षणे पुरूषांच्या तुलनेत वेगळी असतात. महिलांमध्ये अपचन, श्वास घेण्यास त्रास होणे, जबडे, मान आणि काखेत वेदना होणे ही हार्ट अटॅक किंवा हार्ट फेलिअरची लक्षणे असू शकतात.

Web Title: More young female are prone to heart diseases, We must know why

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.