Monsoon Special : पावसाळ्यात फिट राहण्यासाठी आणि आजार टाळण्यासाठी खास टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 12:53 PM2018-06-28T12:53:31+5:302018-06-28T12:53:34+5:30

पावसात मजा करण्याच्या उत्साहात आपण काही गोष्टींकडे अजिबात लक्ष देत नाही. त्यामुळे आजारी पडणे आलेच.

Monsoon Special : Tips to stay fit in the monsoon and avoid illness! | Monsoon Special : पावसाळ्यात फिट राहण्यासाठी आणि आजार टाळण्यासाठी खास टिप्स!

Monsoon Special : पावसाळ्यात फिट राहण्यासाठी आणि आजार टाळण्यासाठी खास टिप्स!

Next

पावसाला तशी जरा उशीराच सुरुवात झाली. आता सगळीकडेच जोरदार पाऊस बरसतो आहे. पाऊस सर्वांनाच आवडतो. पण पाऊस एन्जॉय करताना काही गोष्टींची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. पावसात मजा करण्याच्या उत्साहात आपण काही गोष्टींकडे अजिबात लक्ष देत नाही. त्यामुळे आजारी पडणे आलेच. पण हे आजारी पडणे तुम्ही रोखू शकता त्यासाठी काही खास टिप्स खालीलप्रमाणे....

जेवणाआधी हात स्वच्छ धुवा

जास्तीत जास्त हेल्थ प्रॉब्लेम हे हातांव्दारे पोटात गेलेल्या किटाणूंमुळे होते. त्यामुळे काहीही खाण्याआधी एकदा हात नक्की धुवा. तुमची नखं वाढली असतील तर ती कमी करावीत. कारण नखांमध्ये लपलेले किटाणू तुम्हाला आजारी करु शकतात. 

काय खावे?

1) कडू आणि चटपटीत पदार्थांचे सेवन करा. 
2) भात, ताक, दही, कारलं, आलं आणि कच्चा कांदा खावू शकता. 
3) पावसाळ्यात गॅस, अपचन अशा समस्या अधिक होतात. त्यामुळे बाहेरचं खाणं टाळा. आपल्या डाएटमध्ये व्हिटॅमिन ई आणि ओमेगा 3 चा समावेश करा. 
4) लिंबू, आलुबुखारा, संत्री, आवळा, पेरु यांसारखे व्हिटॅमिन सी असलेले फळे खावे. यामुळे स्कीनच्या समस्या दूर होतात. 

हे पदार्थ खाऊ नये

1) पालेभाज्या पावसाळ्यात अजिबात खाऊ नये. कारण पावसाळ्यात भाज्यांवर मोठ्या प्रमाणात किटाणू असतात. पावसाळ्यात पालेभाज्या डायजेस्ट होत नाहीत. 
2) स्ट्रीट फूड आणि फास्ट फूड खाऊ नका.
3) आधीच कापून ठेवलेली फळे खाऊ नका. 
4) जास्त मिठ असलेले किंवा आबंट पदार्थ खाऊ नका.
5) खूप जास्त तळलेले किंवा भाजलेले पदार्थ खाऊ नका. 

भीजलेले कपडे परिधान करु नका

जर तुम्ही पावसात भीजले असला तर शक्य असल्यास लगेच कपडे बदला. ओल्या कपड्यांमध्ये जास्त वेळ राहू नका. खासकरुन भीजलेले अंडरगारमेंट्स वापरल्यास फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. त्यासोबतच भीजलेले शूज आणि सॉक्सही वापरू नका.

घराची स्वच्छता

घरात किंवा घराजवळ पाणी साचल्यास त्यात डास आणि इतर किटाणू होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पाणी साचू देऊ नका. घरातील लादी वेळोवेळी स्वच्छ करा. चपला-जोडे घरात आत नेऊ नका. 
 

Web Title: Monsoon Special : Tips to stay fit in the monsoon and avoid illness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.