'या' सवयीमुळे पुरूषांच्या स्पर्मची संख्या आणि गुणवत्तेवर होत आहे प्रभाव, वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 02:03 PM2022-01-27T14:03:49+5:302022-01-27T14:05:41+5:30

Sperm count and quality : काही लोक मोबाइलचा वापर फक्त कामासाठी करतात आणि काही लोक मोबाइल गेम खेळण्यासाठी, सिनेमे बघण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी करतात.

Mobile phone devices reduced sperm count and quality and could be making men infertile | 'या' सवयीमुळे पुरूषांच्या स्पर्मची संख्या आणि गुणवत्तेवर होत आहे प्रभाव, वेळीच व्हा सावध

'या' सवयीमुळे पुरूषांच्या स्पर्मची संख्या आणि गुणवत्तेवर होत आहे प्रभाव, वेळीच व्हा सावध

googlenewsNext

Sperm count and quality : आजच्या आधुनिक काळात मोबाइल फारच गरजेचा झाला आहे. जगात असे जास्त लोक आहेत ज्यांचं सगळं काम मोबाइलवर होतं. त्यासोबतच मुलांच्या क्सासेपासून ते दूर असलेल्या लोकांसोबत गप्पा मारण्यापर्यंत, प्रत्येक कामासाठी मोबाइल गरजेचा आहे. आधी कीपॅडचे मोबाइल होते. आता स्मार्टफोन आलेत. मोबाइल आधुनिक झाले. 

काही लोक मोबाइलचा वापर फक्त कामासाठी करतात आणि काही लोक मोबाइल गेम खेळण्यासाठी, सिनेमे बघण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी करतात. मात्र, पुरूषांनी मोबाइलचा अधिक वापर करणं त्यांच्या वैवाहिक जीवनात मोठी अडचण निर्माण करू शकतं. मोबाइलच्या वापराने पुरूषांमध्ये शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता (infertile) कमी होत आहे.

दक्षिण कोरियाच्या रिसर्चरने ४ हजार २८० नमूने असलेल्या रिसर्चच्या विश्लेषणाच्या आधारावर सल्ला दिला आहे की, मोबाइलमधून निघत असलेल्या विद्युत चुंबकीय तरंगांनी शुक्राणूंना नुकसान पोहोचतं. त्यामुळे पुरूषांनी मोबाइलचा वापर कमी करावा.

शेफील्ड विश्वविद्यालयात एंड्रोलॉजीचे प्राध्यापक आणि शुक्राणू तज्ज्ञ एलन पेसी यांनी वैज्ञानिकांच्या निष्कर्षावर प्रश्न उपस्थित केला आणि म्हणाले की, होऊ शकतं की आधुनिक जीवनात पुरूषांच्या शुक्राणूसाठी हे चांगलं नसेल, पण हे पूर्णपणे स्पष्ट नाही की, मोबाइल फोनमुळे शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता कमी होत आहे. हा रिसर्च गेल्या १० वर्षांपासून केला जात आहे. यात अजून बरंच कन्फ्यूजन आहे आणि हा न सोडवला गेलेला प्रश्न आहे. पण जर पुरूष या निष्कर्षाने चिंतेत असतील तर त्यांनी मोबाइलचा वापर कमी केला पाहिजे.

तेच पुसान नॅशनल यूनिव्हर्सिटीचे प्रमुख वैज्ञानिक डॉ. यून हाक किम म्हणाले की, जे पुरूष मोबाइल फोनचा अधिक वापर करत आहेत. त्यांनी त्यांच्या शुक्राणुंची गुणवत्ता योग्य ठेवण्यासाठी मोबाइल फोनचा कमी वापर करायला पाहिजे. सध्याच्या डिजिटल जगात नव्या मोबाइलमधून निघणारे विद्युत चुंबकीय तरंगाच्या संपर्कात आल्याने काय प्रभाव होतो, यावर आणखी रिसर्चची गरज आहे.
 

Web Title: Mobile phone devices reduced sperm count and quality and could be making men infertile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.