शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

चमत्कार!! देशात प्रथमच रुग्णाला रक्त न चढवता हृदय प्रत्यारोपण, 'या' शहरात यशस्वी शस्त्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 19:34 IST

ही आशियातील 'अशी' पहिलीच हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ठरली

Blood less heart transplant: भारतात प्रथमच एका रुग्णाचे हृदय प्रत्यारोपण अशा प्रकारे करण्यात आले की त्याला रक्ताच्या एका युनिटचीही गरज भासली नाही. सहसा, शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला रक्त दिले जाते कारण शस्त्रक्रियेदरम्यान बराच रक्तस्त्राव होतो. पण नवीन तंत्र वापरून आणि शस्त्रक्रियेची पद्धत बदलून डॉक्टरांनी हा चमत्कार करून दाखवला आहे. ही शस्त्रक्रिया गुजरातमधील अहमदाबादमध्ये करण्यात आली. या शस्त्रक्रियेत रुग्णाला रक्तस्त्राव होण्याची शक्यता जास्त असते. पण भारतीयडॉक्टरांनी सर्वात कठीण ऑपरेशन समजले जाणारे हृदय प्रत्यारोपण अशा प्रकारे केले की रुग्णाला रक्ताच्या एक युनिटचीही गरज भासली नाही. हा एक चमत्कारच मानला जात आहे.

आशियातील 'असे' पहिलेच हृदय प्रत्यारोपण

या शस्त्रक्रियेची प्रक्रिया सुमारे महिनाभरापूर्वी अहमदाबादमधील मरेंगो सीआयएमएस हॉस्पिटलमध्ये झाली. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादचे रहिवासी असलेले चंद्रप्रकाश गर्ग ५२ वर्षांचे आहेत. ज्यांचे हृदय निकामी झाले होते. रस्ता अपघातात मरण पावलेल्या ३३ वर्षीय दात्याचे हृदय त्यांना मिळाले. रूग्णालयाचे हृदय प्रत्यारोपण सर्जन डॉ. धीरेन शाह यांच्या म्हणण्यानुसार, आशियामध्ये रक्त चढविल्याशिवाय शस्त्रक्रिया करणे शक्य झालेले नव्हते, पण यावेळी हृदय प्रत्यारोपणासारखी अवघड प्रक्रिया शक्य झाली. 

डॉक्टरांनी केला चमत्कार

या ऑपरेशनमध्ये सर्वप्रथम, अमेरिकेतून आणलेल्या एका विशेष मशीनद्वारे शस्त्रक्रियेदरम्यान रक्त पातळ आणि घट्ट होण्यावर लक्ष ठेवण्यात आले. रुग्णाचे किती रक्त कमी होऊ शकते आणि कमी-जास्त रक्तस्त्राव होण्याचे कारण काय हे सांगण्यास हे मशीन सक्षम आहे. त्यामुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रियेपूर्वी आणि दरम्यान रुग्णाच्या स्थितीचे आणि त्याच्या रक्ताचे विश्लेषण केले. म्हणजेच, रक्त गोठणे किती आहे आणि ते किती पातळ होत आहे? बारीक होण्यामागे कोणती कारणे असू शकतात आणि रक्तप्रवाह व्यवस्थित कसा राखता येईल यावर लक्ष केंद्रित केले होते.

एका तासात दोन शस्त्रक्रिया

रक्त गोठवताना किंवा पातळ करताना यकृत कसे काम करेल, या सर्व गोष्टीही शस्त्रक्रियेदरम्यान पाहण्यात आल्या. शस्त्रक्रियेची वेळ कमीत कमी ठेवण्यात आली होती. छाती उघडायला, हृदय प्रत्यारोपण करायला आणि पुन्हा बंद करायला एकूण एक तास लागला. सहसा यास दोन तास लागतात. त्यात रक्त हा अवयव मानला जातो. पण डॉक्टरांनी चमत्कार केला.

'हृदय प्रत्यारोपणात 5 ते 7 युनिट रक्त द्यावे लागते'

साधारणपणे, प्रत्येक मोठ्या शस्त्रक्रियेमध्ये रुग्णाला रक्त दिले जाते, हृदय प्रत्यारोपणामध्ये 5 ते 7 युनिट रक्त द्यावे लागते. परंतु रक्तदान केल्याने संसर्ग होऊ शकतो, रुग्णाचे तापमान कमी किंवा जास्त असू शकते, रुग्णाचे शरीर पूर्णपणे रक्त नाकारू शकते. असे धोके कायम आहेत. पण या नवीन यांत्रिक तंत्राने रक्ताची गरज पूर्णपणे संपुष्टात येऊ शकते किंवा कमी करता येते. हे तंत्र इतर शस्त्रक्रियांमध्ये देखील वापरले जाऊ शकते. हे अमेरिकन तंत्रज्ञान सध्या फक्त अहमदाबादमध्येच उपलब्ध आहे.

टॅग्स :Heart Diseaseहृदयरोगahmedabadअहमदाबादhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरHealthआरोग्यIndiaभारत