शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाबत चुकीची माहिती मिळल्यानं लाखो लोकांचा जीव धोक्यात; तज्ज्ञ म्हणाले की....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2020 21:02 IST

जगभरात आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या दोन कोटी ८० लाख केसेस समोर आल्या आहेत. तर ९ लाख लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे. 

कोरोना व्हायरसच्या माहामारीशी  संबंधित चुकीच्या सुचनांचा प्रसार रोखण्यासाठी राष्ट्र एवं प्रोद्योगिक कंपन्यांना सहयोग करण्याचे भारतानं निवेदन दिलं आहे. यादरम्यान खोटी माहिती आणि बातम्या, व्हिडीओ यांमुळे माहामारीचा सामना करताना प्रशासकिय  यंत्रणांवर लोक कमी विश्वास ठेवतात. संयुक्त राष्ट्राच्या  ७४ व्या महासभेत शांतीची संस्कृती या कार्यक्रमादरम्यान कोरोना व्हायरसच्या दीर्घकालीन परिणामांवर चर्चा करण्यात आली. जगभरात आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या दोन कोटी ८० लाख केसेस समोर आल्या आहेत. तर ९ लाख लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे. 

संयुक्त राष्ट्राचे भारतील स्थायी मिशन काऊंसलर पाऊलोमी  त्रिपाठी यांनी सांगितले की, ''कोरोनाच्या माहामारीला रोखण्यासाठी समाजात वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. खोटी माहीती पसरल्यामुळे कोरोनाचा धोका जास्त वाढत आहे. त्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडत नाही. या माहामारीच्या काळात सामाजिक आणि राजनैतिक शत्रुता वाढवण्यासोबतच देशांमधील ताण तणावाचं वातावरण वाढत आहे. याशिवाय  हिंसा, कट्टरता, भेदभाव वाढीस लागला आहे.  देशांमधील प्राद्योगिक भागिदारी आणि संबंधांमध्ये सहयोग ठेवणं आवश्यक आहे. जेणेकरून चुकीच्या माहितीचा प्रसार रोखता येऊ शकेल.''

चीनने तयार केली नेझल स्प्रेद्वारे दिली जाणारी कोरोना लस

चीनमधील तज्ज्ञांनी कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी नाकाद्वारे दिली जाणारी कोरोना लस तयार केली आहे. नेजल स्प्रे च्या स्वरुपात ही लस असेल. या लसीच्या चाचणीसाठी परवानगी मिळाली असून नोव्हेंबरपर्यंत या लसीच्या पहिल्या टप्प्यातील ट्रायलची सुरूवात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील चाचणीसाठी  जवळपास  १०० लोकांना सहभागी करून घेतलं जाणार आहे. युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग, झीमान युनिव्हर्सिटी आणि बिजिंग वातांय बायोलॉजिकल फार्मसीमधील शास्त्रज्ञांकडून ही लस तयार करण्यात आली आहे.

चीनच्या  नॅशनल मेडिकल प्रोडक्ट्स एडमिनिस्ट्रेशनकडून या लसीला परवानगी देण्यात आली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँगचे मायक्रोबायोजिस्ट आणि प्रमुख शास्त्रज्ञ युयेन याँग यांनी दिलेल्या माहितीनुसार  या लसीमुळे व्हायरसला प्रवेशमार्गात म्हणजेच नाकातून शरीरात जाण्यापासून रोखता येऊ शकतं. तसंच या लसीमुळे कोरोना व्हायरशी लढण्यासाठी एंटीबॉडी विकसित करण्यास मदत होईल. या लसीच्या लसीकरणासाठी दुप्पटीनं खबदारी घेतली जाणार आहे.  कोरोना व्हायरस आणि इन्फ्लुएंजा व्हायरसपासून बचाव करण्यासाठी ही लस परिणामकारक ठरेल. या नाकाद्वारे दिल्या जात असलेल्या लसीच्या तिन्ही चाचण्या पूर्ण करण्यासाठी जवळपास एक वर्षांचा कालावधी लागू शकतो. 

पुढे त्यांना सांगितले की, इन्जेक्शनच्या तुलनेत नाकाद्वारे दिली जाणारी लस मोठ्या प्रमाणावर लोकांचा व्हायरसपासून बचाव करण्यासाठी तसंच उत्पादनासाठी सोईची ठरणार आहे. याशिवाय या लसीमुळे श्वसनप्रणालीवर कोणताही वाईट परिणाम दिसून येणार नाही असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. आपातकालीन स्थितीत या लसीच्या उत्पादनासाठी चीनच्या काही खासगी कंपन्याना परवागनी देण्यात आली आहे. 

हे पण वाचा-

मास्क वापरताना 'या' चुका केल्यानं वाढतो कोरोना संसर्गाचा धोका; WHO नं दिल्या गाईडलाईन्स

वाढत्या कोरोनाच्या प्रसारात अमेरिकेनं दिली खुशखबर; ऑक्टोबरच्या शेवटापर्यंत लस मिळणार 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्या