शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
2
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
3
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
4
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
5
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
6
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
7
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
8
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
9
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
10
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
11
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
12
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
13
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
14
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
15
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
16
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
17
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
18
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
19
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
20
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

बाजरीच्या भाकरीचे इतके फायदे की तुम्हाला रोज खावीशी वाटेल, वजन कमी करण्यासाठी रामबाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 15:20 IST

जाणून घेऊया, बाजरीची भाकरी खाल्ल्यानं वजन कसं कमी करता येतं. यासोबतच वजन कमी करण्यासाठी बाजरीच्या इतर कोणत्या पाककृती बनवता येतील हेदेखील माहिती करून घेऊ.

स्थूलपणा कमी करण्यासाठी डायटिंग खूप आवश्यक आहे, असं म्हटलं जातं. मात्र, पोट भरून खाल्ल्यानंतरही तुमचं वजन कमी होऊ शकतं. फक्त यासाठी तुम्हाला गव्हाच्या पोळीऐवजी बाजरीची भाकरी खावी लागेल. चला जाणून घेऊया, बाजरीची भाकरी खाल्ल्यानं वजन कसं कमी करता येतं. यासोबतच वजन कमी करण्यासाठी बाजरीच्या इतर कोणत्या पाककृती बनवता येतील हेदेखील माहिती करून घेऊ.

वजन कमी करण्यासाठी बाजरीच्या भाकरीचे फायदेआहारतज्ज्ञ डॉ.रंजना सिंग यांनी झी न्यूजशी बोलताना स्थूलपणा कमी करण्यासाठी बाजरी या धान्याच्या उपयुक्ततेविषयी माहिती दिली. त्या म्हणतात, वजन कमी करण्यासाठी डायटिंग आवश्यक नाही. उलट आहारात बदल करूनही पोटावरी चरबी जाळली जाऊ शकते. बाजरीमध्ये फायबर असतं. यामुळं पोट जास्त काळ भरलेलं राहतं. बाजरीची भाकरी पोटभर खाल्ल्यानंतर तुम्हाला इतर कोणतंही खाद्य पोटभरण्यासाठी खावं लागत नाही. तसंच, लगेच पुन्हा जेवावं लागत नाही. यामुळं कोणतंही अस्वास्थ्यकर अन्न खाणं टाळलं जातं. यासोबतच, बाजरीची भाकरी रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल, पचनक्रिया बिघडणं यासारख्या स्थूलपणा वाढवणाऱ्या बाबी सुधारण्यास मदत करते.

आहारतज्ज्ञ डॉ. रंजना सिंह यांच्या मते, लठ्ठपणा कमी करण्यासाठी बाजरीच्या भाकरीसोबतच इतर काही पाककृतींचीही मदत घेतली जाऊ शकते. त्या कोणत्या आहेत ते पाहू.

बाजरीची खिचडीखिचडी हा एक अतिशय आरोग्यदायी पदार्थ आहे. याच्यामुळं तुमचं पोट निरोगी राहतं. पण, तांदळाच्या ऐवजी बाजरीचा वापर केल्यानं तुम्ही वजनही कमी करू शकता. मधुमेही रुग्णही हा पदार्थ कोणतीही काळजी न करता खाऊ शकतात.

बाजरीची लापशीनाश्त्यात बाजरीची लापशी खाणं लठ्ठपणा कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. बाजरीमध्ये केळी मिसळून तुम्ही ती अधिक फायदेशीर बनवू शकता. याच्या मदतीने तुम्हाला दिवसभरासाठी आवश्यक प्रोटीन आणि एनर्जीदेखील मिळेल.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स