दूध पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते, परंतु काहीवेळा हे दूध हे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. दुधामध्ये होणारी भेसळ हे त्याचे मुख्य कारण आहे. त्याचप्रमाणे न भेसळ केलेल दुधही जास्त पिणे आपल्याला महागात पडू शकते. कसे? वाचा पुढे
पोटाच्या समस्याआपण आवश्यकतेपेक्षा जास्त दूध पिल्यास, यामुळे आपल्या शरीरात बर्याच समस्या उद्भवू शकतात. दुधाच्या अतिसेवनाने पोट फुगण्याची समस्या उद्भवू शकते, तसेच गॅसचा देखील त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत दुधाचे सेवन योग्य प्रमाणात करा जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवनार नाही.
सरकोपेनियाचा धोकाएका अभ्यासानुसार वृद्ध लोकांमध्ये दुधाचे आणि दुग्धजन्य पदार्थांचे दररोज सेवन केल्याने अशक्तपणा आणि सरकोपेनियाचा धोका कमी होतो.
अस्वस्थता, थकवा आणि आळशीपणाची समस्याजास्त प्रमाणात दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्यास कधीकधी मळमळ, अस्वस्थता, थकवा आणि सुस्तपणा येऊ शकतो.
आतड्यांची जळजळया प्रोडक्ट्स मध्ये ए १ केसीन असते, ज्यामुळे आतड्यांमध्ये जळजळ होते आणि बॅक्टेरियांना प्रोत्साहन मिळते.