मिलिंद शिंदे यांचा भिडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 06:10 IST2016-02-18T13:10:28+5:302016-02-18T06:10:28+5:30

नाच तुझंच लगीन हाय या सिनेमानंतर मिलिंद शिंदे पुन्हा भिडू या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यास तयार झाले आहे. याच चित्रपटात ते स्वत: श्रीकांत या व्यकतीरेखेची भुुमिका करत असून त्यांच्या सोबतीला फॅन्ड्री चित्रपटात आपल्या अभिनयाने सगळयांची वाहव्वा मिळवलेल्या छाया कदम सुध्दा प्रमुख भुमिकेत पाहिला मिळतील

Milind Shinde Bhatu | मिलिंद शिंदे यांचा भिडू

मिलिंद शिंदे यांचा भिडू

 
ाच तुझंच लगीन हाय या सिनेमानंतर मिलिंद शिंदे पुन्हा भिडू या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यास तयार झाले आहे. याच चित्रपटात ते स्वत: श्रीकांत या व्यकतीरेखेची भुुमिका करत असून त्यांच्या सोबतीला फॅन्ड्री चित्रपटात आपल्या अभिनयाने सगळयांची वाहव्वा मिळवलेल्या छाया कदम सुध्दा प्रमुख भुमिकेत पाहिला मिळतील.या चित्रपटाची कथा स्वत: मिलिंद शिंदेनी लिहीली असून छायाचित्रण श्रीपाद दगडे यांनी केले आहे.  या चित्रपटाचे दिग्दर्शक मिलिंद शिंदे यांनी लोकमत सीएनएक्सशी संवाद साधताना म्हणाले,जयपूर फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाला उत्कृष्ट पटकथा लेखक म्हणून मिळाला आहे.तसेच या सिनेमाच कथानक हे वयाच्या पस्तीशी गाठलेल्या व वडील नसलेल्या मतीमंद मुलावर बेतलेला आहे.चित्रपटातील भुमिका दर्जेदार होण्यासाठी मिलिंद शिंदेनी मतीमंद मुलांबरोबर वेळ घालवुन त्यांच्यातील बारकावे टिपण्याचा प्रयत्नदेखील केला आहे. हा चित्रपट जुलैच्या शेवटच्या आठवडयात प्रदर्शित करण्यात येणार आहे.

    
  
      
 
 

Web Title: Milind Shinde Bhatu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.