(Image Credit : LeadSA)
आरोग्य चांगलं राहिलं तर सगळं चांगलं राहतं. त्यामुळे सर्वांनाच आपल्या आरोग्याची खास काळीज घ्यावी लागते. आज आम्ही तुम्हाला पुरूषांच्या आरोग्याबाबत काही सांगणार आहोत. कारण १० ते १६ जूनदरम्यान 'मेन्स हेल्थ वीक' (Men’s Health Week : 2019) पाळला जातो. नेहमीच पुरूष कामात इतके व्यस्त असतात की, ते त्यांचं रेग्युलर चेकअप करणं विसरतात. काही पुरूषांना वाटतं की, ते शरीराने फिट आहेत, कारण ते जिममध्ये वर्कआउट करतात. पण असा विचार करणं चुकीचं आहे. खासकरून तेव्हा जेव्हा तुमचं वय ३५ च्या वर झालं असेल. या वयात रूटीन चेकअप करणे तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. चला जाणून या वयात कोणते चेकअप करायलाच हवं.
दातांचं चेकअप
तुम्हाला हे माहीत आहे का की, दात आणि हृदयाचा संबंध काय असतो? दातांमध्ये होणारे रोग हार्ट अटॅकचा धोका वाढवतात. त्यामुळे पुरूषांनी खासकरून दातांची दर सहा महिन्यातून तपासणी करावी. कारण गुटखा, तंबाखू इत्यादींच्या सेवनामुळे हिरड्यांमध्ये होणारी कोणतीही समस्या सामान्य समजू नका. तोंडात जर फोड झाले असतील, पुरळ झाली असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. तोंडात जराही काही समस्या जाणवेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
ब्लड शुगर
ब्लड शुगरचं प्रमाण वाढल्यावर डायबिटीस होऊ शकतो. ३५ वयानंतर वर्षातून १ ते २ वेळा ब्लड शुगरचं प्रमाण आवर्जून तपासलं पाहिजे. जर तुम्हाला वेळीच डायबिटीसची माहिती मिळाली तर तुम्ही योग्य ते उपचार घेऊन आणि लाइफस्टाईलमध्ये बदल करून हा आजार बरा करू शकता. तसेच डायबिटीसची माहिती वेळीच मिळाली तर तुम्ही त्यानंतर होणाऱ्या आजारांपासूनही स्वत:चा बचाव करू शकता.
कोलेस्ट्रॉल लेव्हल
हाय कोलेस्ट्रॉलमुळे हार्ट अटॅक, कार्डियक अरेस्ट, हार्ट ब्लॉक इत्यादींची शक्यता वाढते. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे धमण्यांमध्ये प्लाक जमा होतं, ज्याने ब्लड सर्कुलेशन प्रभावित होतं. एका वर्षात एकदा पुरूषानी कोलेस्ट्रॉल चेक करणं फायद्याचं ठरेल. आजकाल कमी वयातच पुरूषांनी हार्ट अटॅकची समस्या वाढत आहे. अशात रेग्युलर चेकअप तुम्हाला हार्ट अटॅकपासून वाचवू शकतं.
लघवी
३५ वयानंतर तुम्हाला जर लघवीसंबंधी काही समस्या जाणवत असेल तर वेळीच लघवीची तपासणी करावी. लघवी करताना कोणत्याही प्रकारची समस्या होण्यामागे प्रोस्टेट ग्रंथीशी संबंधित समस्या असू शकते. जर प्रोस्टेटमध्ये सूज असेल तर यूरिनेशन कमी होतं. पण प्रोस्टेट वाढणं किंवा अनियमित यूरिनेशनचा अर्थ हा नाही की, तुम्हाला आरोग्यासंबंधी काही समस्या झाली असेल, पण याबाबत डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
कंबरेची तपासणी
सामान्यपणे या वयानंतर लठ्ठपणाचा प्रभाव कंबर आणि पोटावर दिसू लागतो. जर तुमच्या कंबरेचा आकार मोठा असेल तर तपासणी नक्की करा. अनेकदा यामुळे डायबिटीस आणि वेगवेगळ्या हृदयरोगांचा धोका वाढतो. कंबरेचा घेर कमी केल्याने हार्ट डिजीज आणि डायबिटीसचा धोका कमी केला जाऊ शकतो. जर एक्सरसाइज करूनही कंबरेचा घेर कमी होत नसेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
हेअरलाइन चेक
जेव्हा तुम्ही फार जास्त तणावात असता तेव्हा कोर्टिसोल आणि एंडॉर्फिन नावाचा हार्मोन व्हाइट ब्लड सेल्सच्या माध्यमातून हेअर फॉलिकल्सला डॅमेज करू शकतात. ज्या कारणाने केसांचा विकास रोखला जातो. अशात वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
एसटीडी
३५ वयानंतर कोणत्याही सुरक्षेशिवाय लैंगिक संबंध ठेवणं टाळा. असं काही केलं असेल तर वेळीच डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. कारण तुम्हाला सेक्शुअली ट्रान्समिटेड डिजीज(एसटीडी) होण्याचा धोकाही असतो.