शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पुरुषांनी वाढत्या वयात वेळीच घ्यावी काळजी, नाहीतर सामोरे जाल गंभीर आजारांना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 20:25 IST

पुरुषांनाही वाढत्या वयाप्रमाणे आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो. अशा अनेक समस्या आहेत ज्याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या समस्यांकडे पुरुषांनी वेळीच लक्ष देणे गरजेच आहे. 

वाढत्या वयाप्रमाणे केवळ स्त्रियांनाच समस्या निर्माण होतात असं नाही. पुरुषांनाही वाढत्या वयाप्रमाणे आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो. अशा अनेक समस्या आहेत ज्याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या समस्यांकडे पुरुषांनी वेळीच लक्ष देणे गरजेच आहे. 

लघवी लीक होणंवाढत्या वयानुसार स्त्रिया अथवा पुरुष दोघांनाही आजारांचा या सामना करावा लागू शकतो. यालाच ओव्हर अॅक्टिव्ह ब्लॅडर (ओएबी) किंवा युरिनरी इनकॉन्टिनन्स (यूआय) असेही म्हणतात. वाढत्या वयातील अनेक पुरूषांमध्ये ही समस्या आढळून येते. प्रोस्टेट या ग्रंथीचा आकार वाढला की ही समस्या उद्भवू शकते. यामुळे मूत्रमार्गातून वाहणाऱ्या लघवीच्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो. मूत्राशयाच्या स्नायूंना दुखापत झाल्यानेही हा आजार उद्भवू शकतो. जीवनशैलीतील बदल आणि वैद्यकीय उपचार याद्वारे हा आजार नियंत्रणात आणला जाऊ शकतो.

लघवीतून रक्त येणंयाकडे पुरुषांनी विशेष लक्ष देणं गरजेच आहे. लघवीतून येणारं रक्त येणं हे मूत्रपिंडाच्या कर्करोगाचं लक्षण असू शकते. त्यामुळे यावर त्वरित उपचार करणं गरजेचं आहे. त्यासाठी लघवीच्या चाचण्या, एक्स-रे सीटी स्कॅन किंवा सिस्टोस्कोपी या पद्धतींचा वापर करण्यात येतो. लघवीद्वारे रक्त पडण्याची समस्या बंद-सुरू होत असेल तरीही या समस्येवर उपचार घेणं आवश्यक आहे.

लघवी करताना त्रास होणंबॅक्टेरियामुळे इन्फेक्शन होणं ही समस्या अनेकदा आढळून येते. यामध्ये व्यक्तीला लघवी करताना  वेदना होतात. वयस्कर पुरूषांमध्ये यामागचे सामान्य कारण असतं. वयस्कर व्यक्तींमध्ये प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढला की ही तक्रार उद्भवते.टेस्टिकल - लिंगाच्या खालच्या भागात वेदना किंवा गाठी होणंदोनापेक्षा अधिक आठवडे जर लिगांच्या खालील भागात वेदना जाणवत असेल किंवा त्या ठिकाणी गाठ घट्टपणा वाटत असेल तर त्वरित युरॉलॉजिस्टचा सल्ला घेण योग्य. हे टेस्टिक्युलरच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. त्यामुळे लवकरात लवकर निदान होणं गरजेचं आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स