शहरं
Join us  
Trending Stories
1
दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरण: "माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, चुकीचा अर्थ काढला गेला", 'त्या' विधानावर ममतांचं स्पष्टिकरण
2
बिहारमध्ये एनडीएचे ठरले; भाजप-जदयूला समान जागा, 'लोजपा'ला २९ तर 'रालोमो'ला ६ जागा
3
मुंबई महापालिकेत सध्याचे आरक्षित प्रभाग बदलणार; चक्राकार पद्धतीने सोडत; इच्छुकांना संधीची आशा
4
अखेर महिला पत्रकारांना अफगाणिस्तानचे निमंत्रण
5
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
6
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
7
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
8
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
9
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
10
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
11
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
12
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
13
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
14
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
15
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
16
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
17
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई
18
सांगलीकर स्मृतीची बॅट चांगलीच तळपली; एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत 'चारचौघीं'वर पडली भारी!
19
Nagpur: दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल, आरपीएफ- जीआरपीची गस्त वाढली, गुन्हेगारांवर नजर!
20
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर

वैज्ञानिकांचा दावा, दारूचं व्यसन सोडवतं हे औषध; लोक स्वत:हून दारूपासून राहतील दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 10:31 IST

सगळ्यात मोठी समस्या ही आहे की, बरेच लोक ईच्छा असूनही दारूचं व्यसन सोडू शकत नाहीत. मात्र, अशा लोकांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे.

भारतात मद्यसेवन करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे आणि एका अंदानुसार, या न्यू ईअरला तर आधीचे सगळे रेकॉर्ड मोडले होते. दारूमुळे केवळ आरोग्य बिघडतं नाही तर याने गुन्हे आणि कौटुंबिक हिंसाही वाढते. सगळ्यात मोठी समस्या ही आहे की, बरेच लोक ईच्छा असूनही दारूचं व्यसन सोडू शकत नाहीत.

मात्र, अशा लोकांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. वैज्ञानिकांना एका रिसर्च दरम्यान दारू सोडवणारं प्रभावी औषध सापडलं आहे. या औषधाची खासियत म्हणजे व्यक्ती आपणहून ही सवय सोडण्यासाठी भाग पडतो.

कुठे आणि कुणी केला रिसर्च?

​The Journal of Clinical Investigation वर प्रकाशित रिसर्च Oregon Health and Science University आणि इतर काही संस्थांच्या वैज्ञानिकांनी मिळून अमेरिकेत केला. दारू सोडवणाऱ्या या औषधाचा प्रभाव पाहून वैज्ञानिक अवाक् झाले. रिसर्चच्या सहलेखिका Angela Ozburn म्हणाल्या की, मी असा प्रभाव याआधी कधी पाहिला नाही.

या औषधाने सुटतं दारूचं जुनं व्यसन

वैज्ञानिकांना आढळलं की, एप्रेमिलास्ट दवा (Apremilast Drug) चं सेवन केल्यावर दारू पिण्याचं मन होत नाही. हा रिसर्च मनुष्यांआधी प्राण्यांवर करण्यात आला. ज्याचा प्रभाव पाहून वैज्ञानिक अवाक् झाले. हा शोध फार महत्वाचा मानला जात आहे.

कोणत्या आजारावर कामी येतं एप्रेमिलास्ट?

वैज्ञानिकांनुसार, एप्रेमिलास्ट एफडीए प्रमाणित एंटी-इंफ्लामेटरी औषध आहे. याचा वापर सोरायसिस उपचारासाठी केला जातो. हे औषध सोरायसिसमुळे होणाऱ्या आर्थराइटिसलाही ठीक करण्यास मदत करतं. या औषधाच्या सेवनाने हेवी ड्रिंकर्स सवय मोडण्यासाठी मदत मिळू शकते.

कसं करतं काम?

वैज्ञानिकांनी सांगितलं की, हे औषध nucleus accumbens ची गतिविधि वाढवतं. हा मेंदूचा असा भाग असतो जो दारूच्या सेवनाला  नियंत्रित करण्यास मदत करतो. ज्या लोकांना दारूचं व्यसन सोडायचं आहे त्यांच्यासाठी हे औषध फायदेशीर ठरू शकतं.

ज्या लोकांना दारू पिण्याचं व्यसन लागतं ते दिवसातून अनेक पेग पितात. पण शोधानुसार, दारू सोडवणारं हे औषध अल्कोहोलची ईच्छाच अर्ध्यापेक्षा जास्त कमी करून टाकते. म्हणजे जर एखादी व्यक्ती दिवसातून 5 पेग घेत असेल तर या औषधाचा वापर करून ते 2 पेगपर्यंत कंट्रोल करू शकतात.

हे अवयव वाचतात...

दारूचं सेवन केल्याने आपल्या शरीरातील अनेक अवयव खराब होतात. जे या औषधामुळे वाचू शकतात. NIAAA नुसार, एल्कोहॉलमुळे मेंदू, हृदय. लिव्हर, पॅंक्रियाज, इम्यून सिस्टम कमजोर होतं. तसेच कॅन्सरचा धोकाही वाढतो. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य