Medical Research : एका व्यक्तीचे डोक कापून लागेल दुसऱ्याच्या शरीरावर, जगातील पहिला प्रयोग !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2017 13:05 IST2017-04-19T07:33:35+5:302017-04-19T13:05:52+5:30
आता पर्यंत अशक्य वाटणारी गोष्ट शक्य होणार आहे. ती कशी ? याबाबत सविस्तर माहितीसाठी वाचा ही बातमी !
.jpg)
Medical Research : एका व्यक्तीचे डोक कापून लागेल दुसऱ्याच्या शरीरावर, जगातील पहिला प्रयोग !
शिर्षक वाचून दचकलात ना? हो, या प्रयोगाला यशस्वी करण्यासाठी इटलीचे एक सायंटिस्ट सज्ज झाले आहेत. जर सर्व काही त्यांच्या योजनेनुसार यशस्वी झाले तर या वर्षी डिसेंबरमध्ये ह्यूमन ट्रान्सप्लांटचे स्वप्न खरे ठरु शकते.
हा प्रयोग इटालियन न्यूरोसर्जन सर्गियो कॅनावेरो हे करीत असून त्यांचा दावा आहे की, त्यांनी ३० वर्ष या प्रक्रियेवर रिसर्च केले आहे आणि आता आधुनिक मेडिकल सायन्सच्या मदतीने जगातील पहिला ह्यूमन हेड ट्रान्सप्लांट करण्याच्या तयारीत आहेत. हे ट्रान्सप्लांट ३१ वर्षीय रशियन प्रोग्रामर वालेरी स्पिरिडोनोववर करण्यात येणार आहे. ते एका गंभीर आजाराच्या कारणाने चालण्या-फिरण्यास असमर्थ आहेत. त्यांनी या ट्रान्सप्लांटमध्ये समन्वयक बनण्यासाठी सहमती दर्शविली आहे. या प्रयोगात वालेरीचे डोके कापून त्यांच्या शरीरापासून वेगळे करण्यात येईल आणि त्यांच्यासारख्याच अनुकूल वैशिट्ये असलेल्या ब्रेन डेड व्यक्तीच्या शरीरावर लावण्यात येईल.

कसे होईल ह्यूमन हेड ट्रांसप्लांट?
* डॉ. सर्गियो यांनी ह्यूमन हेड ट्रान्सप्लांटच्या या संपूर्ण प्रक्रियेला दोन टप्प्यात विभागले आहे. पहिल्या प्रक्रियेला त्यांनी ‘हेवन’ HEAVEN (HEad Anastomosis VENture) असे नाव दिले आहे. आणि त्यानंतरच्या प्रक्रियेचे नाव ‘जेमिनी’ GEMINI दिले असून त्यात स्पाइनल कॉडला ट्रान्सप्लांट केले जाईल.
* यासाठी दोन टीम बनविण्यात येणार असून ज्या डोनर आणि रिसीवर अशा दोघांवर एकसोबत काम करतील. दोन्ही पेशंटच्या मानेवर खोलगट कापून आर्टरीज, नसा आणि स्पाइनला बाहेर काढण्यात येईल. ज्या प्रकारे इलेक्ट्रिक वायर्स जोडल्या जातात त्याचप्रमाणे मसल्सना लिंक करण्यासाठी कलर कोड बनविण्यात येतील.
* पेशंटची मान कापण्यासाठी सुमारे १ करोड ३० लाख रुपये किमतीचे डायमंड नॅनोब्लेड्स वापर करण्यात येईल. हे नॅनोब्लेड्स यूनिव्हर्सिटी आॅफ टेक्ससतर्फे प्रोव्हाइड करण्यात येतील.
* दोन्ही पेशंटची मान कापून झाल्यानंतर तासाभरातच समन्वयकाची मान डोनरच्या धडाला जोडण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येईल.
* डोनरच्या धडाला जिवंत ठेवण्यासाठी त्यात ट्यूब्सद्वारे ब्लड सर्कु लेशन सुरु ठेवण्यात येईल. रक्ताच्या नळ्यांमध्ये १५ ते ३० मिनीटांपर्यंत विशिष्ट प्रकारचा ग्लू
* डोनर के धड़ को जिंदा रखने के लिए उसमें ट्यूब्स के जरिए ब्लड सकुर्लेशन बनाए रखा जाएगा। खून की नलियों में 15 से 30 मिनट तक खास किस्म का ग्लू (chitosan-PEG glue) टाकण्यात येईल आणि कच्चे टाके लावण्यात येतील.
* सर्व नसा आणि स्पाइनल कॉर्डला कोडिंग आणि मार्किं गच्या तुलनेने जोडण्यात येईल. त्यानंतर एक विशेष प्लास्टिक सर्जन त्वचेला शिवण्याचे आणि जोडण्याचे काम करेल.
* संपूर्ण प्रक्रियेनंतर तयार झालेल्या शरीराला ३ दिवसापर्यंत सर्व्हाइकल कॉलर लावून आयसीयूमध्ये ठेवण्यात येईल.
* खर्च, वेळ आणि मॅनपॉवर
- या आॅपरेशनच्या प्रक्रियेला सुमारे ३६ तासाचा कालावधी लागण्याचा अनुमान आहे. तसेच संपूर्ण आॅपरेशनसाठी सुमारे २० मिलियन डॉलर(१३० करोड) रुपये खर्च अपेक्षित आहे. शिवाय १५० तज्ज्ञांची टीम काम करेल, ज्यात डॉक्टर्स, नर्सेस, टेक्निशियन, सायकोलॉजिस्य आणि व्हर्चुअल रिअॅलिटी इंजीनियर्सचाही समावेश असेल.

* आॅपरेशन कुठे होईल
आॅपरेशनसाठी अजूनपर्यंत कुठल्या देशाची किंवा हॉस्पिटलची निवड करण्यात आली नाही, मात्र सर्जन कॅनावेरो इंग्लंडमध्ये हे आॅपरेशन करु इच्छिता. कारण तिथे त्यांना भरपूर समर्थन मिळत आहे.
जर एखाद्या कारणाने इंग्लंड सरकारने परवानगी नाकारली तर ते दुसऱ्या अन्य देशात आॅपरेशन करतील. एक शक्यता अशी देखील आहे की, डॉ. कॅनावेरो त्यांचे चीनचे सहकारी डॉ. रेन जियाओपिंगसोबत हे आॅपरेशन चीनमध्ये करतील. डॉ. रेन जियाओपिंग यांनी गेल्या वर्षी एका माकडाचे हेड ट्रान्सप्लांट केले होते शिवाय त्यांनी डॉ. कॅनोवेरोसोबतच एक हजारांपेक्षा जास्त उंदिरांवर या प्रकारचा प्रयोग केला आहे.

* या प्रोजेक्टवर व्यक्त केली जात आहे शंका
चार्ल्स ओ स्ट्रायकर ट्रान्सप्लांट सेंटरचे डायरेक्टर डॉ. जोस ओबेरहोल्जर यांनी या प्रोजेक्टच्या रिस्कवरुन प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की,
- कोणतेच शरीर नव्या आॅर्गनला स्वीकारत नाही. यासाठी शरीराच्या इम्यून सिस्टमला बंद करावे लागेल.
- इम्यून सिस्टमला बंद केल्याने इन्फेक्शनची संभावना वाढते.
- याशिवाय सर्वात मोठी अडचण टेक्नॉलॉजीची आहे. आतापर्यंत आपणाजवळ स्पाइन कापून दुसऱ्यादा जोडण्याची यशस्वी टेक्नीक नाही आहे.
- डोक्याला धडाशी जोडण्यासाठी शेकडोच्या संख्येने कनेक्शन्स जोडावे लागतील. यामुळे कॉम्प्लिकेशन आणि इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो.