जॉन अब्राहम वर मराठी संस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2016 12:13 IST2016-03-25T19:13:58+5:302016-03-25T12:13:58+5:30
बॉलीवुडचा अॅक्शनपटू जॉन अब्राहम या अभिनेत्याला देखील लागले मराठी इंडस्ट्रीचे वेड

जॉन अब्राहम वर मराठी संस्कार
ॉलीवुडचा अॅक्शनपटू जॉन अब्राहम या अभिनेत्याला देखील लागले मराठी इंडस्ट्रीचे वेड. विदया बालन, माधुरी दिक्षित, सलमान खान या अभिनेत्रींच्या पाठोपाठ आता, बॉलीवुडचा तगडा कलाकारा जॉन अब्राहिम ही म्हणतो की,आता पर्यत मी खूप चित्रपटात काम केले आहे. पण आता मला मराठी चित्रपटात काम करायचाय आहे. मी मराठी मुलगा आहे आणि मराठी मुलगा असलेल्याचा मला अभिमान आहे.मी मराठमोळ्या संस्कारात लहानाचा मोठा झालो. तसेच जॉन म्हणाला माझी आजी पुण्याची आहे. लहानपणी आम्ही पुण्यात यायचो खूप धमाल करायचो. पुणे हे तरुणाई शहर आहे. पुण्यातील वातावरण मला खूप आवडते. मी लवकरच मराठी चित्रपटात काम करणार आहे. रॉकी हॅण्डसम या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्यात आला असताना त्याने ही इच्छा व्यक्त केली आहे.तसेच या चित्रपटात त्याने एका गाण्यासाठी पार्श्वगायनदेखील केले आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम, दिया, श्रुती हसन, नथालीया कौर, शरद केळकर, संजय खापरे, उदय टिकेकर या कलाकारांचा समावेश आहे.