करीयर आणि कुटूंब या दोन्ही गोष्टी साभांळत असताना स्त्रीयांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. त्यामुळे बरयाच स्त्रिया ह्या स्वतःच्या वयापेक्षा अधिक मोठ्या दिसू लागतात. जर तुमचे सुध्दा तुमच्या त्वचेकडे किंवा आरोग्याकडे दुर्लक्ष होत असेल तर या पध्दतीचा वापर करून तुम्ही आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकता.

(image credit-brightside)

१) फेस क्लीन्जरचा वापर करा

(image credit-lorealparisusa)

३० वयानंतर  ६ते ७ वर्ष आपल्या त्वचेला सगळ्यात जास्त काळजी घेण्याची आवश्कता असते. याचे कारण असे की या वयात त्वचेची काळजी घेतल्याने फरक दिसून येतो. त्यावेळी आपली त्वचा ज्या अवस्थेत असते. तेव्हा आपण त्या सोयीनुसार क्लीनजरचा वापर करू शकतो. या वयात  तेलकट त्वचा असूनही ,चेहरा तेलकट होत नाही. त्यामुळे सॉफ्ट क्लिजरचा वापर करावा.

 

२) मॉईश्चरायजर वापरा 
 

(image credit-youbeauty)

चेहरयाला पोषण मिळण्यासाठी आणि मॉईश्चराईज ठेवण्यासाठी मॉईश्चरायजर लावावे. जेणेकरून त्वचा रूक्ष आणि कोरडी होणार नाही. या वयात जीवनसत्त्व c असलेल्या तेलाचा वापर करणे फायदेशीर ठरते. ऑलिव्ह ऑईलने चेहऱ्याची मसाज केल्यास त्वचेत बदल दिसून येतो.

३) काळ्या डागांपासुन सुटका

या वयात चेहऱ्यावर आसणाऱ्या काळ्या डागांची समस्या प्रकर्षाने जाणवते. यावर उपाय म्हणून उन्हापासुन त्वचेचे रक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी बाहेर उन्हात जाताना सन्सक्रीन आथवा लोशन चेहरयाला लावून जाणे फायदेशीर ठरते.त्यामुळे काळ्या डागांपासून मुक्तता मिळेल आणि सनबर्न होणार नाही.


४) फेसमास्क 

(image credit-shape.com)

कोणत्याही वयोगटात फेसमास्कचा वापर करणं लाभदायी ठरते. ३० वयानंतर फेसमास्कचा वापर केल्यास चेहरा चमकदार  राहण्यास मदत होते.


५) व्यायाम करा

(image credit-cookinglight)

 

 ३० वयानंतर आपल्या हाडांना किंवा स्नायुंना मजबुत ठेवण्यासाठी व्यायाम करणे अत्यावश्यक आहे. व्यायामाने स्नायु लवचीक राहण्यास मदत होते. रक्ताभिसरण उत्तमरीत्या होते. परीणामी वाढत्या वयातही शरीर निरोगी राहते.
 

Web Title: maintain the beauty of ageing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.