शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

Mahashivratri2018 : महाशिवरात्रीनिमित्त जाणून घ्या उपवास करण्याचे 10 फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 7:02 PM

उपवास करणे ही धार्मिक बाब असली तरी उपाशी राहण्याचे काही वैज्ञानिक फायदेही आहेत.

मुंबई - उद्या महाशिवरात्री असल्याने अनेकजण उपवास धरतात. अनेकजण दिवसभर काहीही न खाता फक्त पाणी पितात आणि दिवसाच्या शेवटी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडतात. महाशिवरात्री, आषाढी एकादशी अशा अनेक महत्वांच्या दिवशी उपवास ठेवले जातात. याव्यतिरिक्त अनेकजण आठवड्यातून एका दिवशी उपवास धरत असतात. उपवास करणे ही धार्मिक बाब असली तरी उपाशी राहण्याचे काही वैज्ञानिक फायदेही आहेत. त्याचा आपल्या शरीराला फायदाच होतो, असे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. जाणून घेऊयात उपवास करण्याचे 10 फायदे. उपवास केल्याने चांगली भूक वाढतेतुम्ही जर दिवसभरात तीन-चार वेळा अन्न ग्रहण करीत असाल तर तुम्हाला खरी भुक म्हणजे काय हे माहिती नसेल. कधीतरी 12 ते 24 तास उपवास करुन बघा. त्यानंतर भुक म्हणजे काय असते ते समजेल. याने तुमचे हार्मोन्स रेग्युलेट होतात. शरीरासाठी हे चांगले आहे. उपवास केल्याने भोजनपद्धती सुधारतेबिंग इटिंग डिसऑर्डरने ग्रस्त असलेल्या लोकांनी उपवास केल्यास फायदा होतो. बऱ्याचदा कामाचे तास आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींमुळे खाण्याची पद्धती विस्कळित झालेली असते. उपवासाने ती सुधारते. त्यामुळे अनेक रोग तुमच्यापासून दूर राहतात. प्रकृती ठणठणीत राहते.

वजन कमी होतेउपवास केल्याने शरीराची जाडी कमी होते. जेवणाच्या पद्धतीत बदल करुन फास्टिंग केल्यास फॅट सेल बर्न करण्यास मदत होते. साखरेऐवजी फॅटमधून एनर्जी घेण्याचे शरीराला संकेत मिळतात. एखाद्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जर लो बॉडी फॅट बर्न करायचे असेल तर अॅथलेट्स उपवास करतात.

उपवास केल्याने इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढतेउपवास केल्याने इन्शुलिन सेन्सिटिव्हिटीवर सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येते. कारबोहायड्रेड (साखर) सहन करण्याची शारीरिक क्षमता वाढल्याचे जाणवते. उपवास केल्याने इन्शुलिन रक्तातून ग्लुकोज घेण्यासाठी सेल्सना संकेत देतात, असे एका अभ्यासातून सिद्ध झाले आहे. मेटॅबोलिझमची गती वाढतेउपवास केल्याने पाचनशक्तीला जरा आराम मिळतो. त्यामुळे मेटॅबोलिझमला कॅलरीज बर्न करण्यासाठी संधी मिळते. जर तुमची पाचनशक्ती कमकुवत असेल तर फॅट बर्न करण्यासाठी आणि फुड मेटॅबोलाईज करण्याची क्षमता कमी होते. उपवास केल्याने मेटॅबोलिझमची कार्यक्षमता वाढते. लॉंगिटीव्हिटीत वाढ होतेतुम्ही कमी खात असाल तर जास्त काळ जगता हे सत्य आहे. भोजनाची योग्य पद्धती राखली तर लोकांची जिवनमान उंचावते आणि वाढते हे काही संस्कृतींमध्ये सिद्ध झाले आहे. मेटॅबोलिझम कमकुवत झाल्याने वयोमान वाढते. तुम्ही म्हातारे दिसू आणि वागू लागता. त्यामुळे शरीर तरुण ठेवण्यासाठी उपवास करायलाच हवा. मेंदुची गती वाढतेउपवास केल्याने ब्रेन डिराईव्ह न्युरोट्रोफिक फॅक्टर (BDNF) नावाचे प्रोटिनची निर्मिती चांगल्या प्रमाणात होते. या प्रोटिनने मेंदुची गती वाढते. कार्य चांगल्या पद्धतीने पार पडते इम्युन सिस्टिममध्ये सुधारणा होतेकॅन्सर सेल्सचे फॉरमेशन थांबवणे, फ्रि रॅडिकल डॅमेज कमी करणे, शरीरातील इन्फ्लेमेटरी कंडीशन नियंत्रित करणे आदी कार्ये उपवासातून साध्य केली जाऊ शकतात. जर एखादा प्राणी आजारी पडला तर तो आराम करण्याऐवजी आधी खाणे बंद करतो. कारण शरीरातून त्याला इंटर्नल सिस्टिमवरील ताण कमी करण्याचे अंतर्गत संकेत मिळतात. त्यामुळे शरीर एखाद्या इन्फेक्शनला जोमाने लढा देऊ शकते. शरीरिक क्षमता वाढतातवाचन, मेडिटेशन, योगा, मार्शल आर्ट आदी कामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी उपवास महत्त्वाचा आहे. शरीरातील पाचन व्यवस्थेत अन्न कमी असेल तर शरीरात जास्त एनर्जी राहू शकते. त्याने काम करण्याची ऊर्जा वाढते. मन संतुलित राहते. नवनवीन कल्पना मनात जन्म घेतात. उत्साह वाढतो. स्कीन चांगली राहतेउपवास केल्याने पाचनक्षमतेला आराम मिळतो. अशा वेळी शरीराला इतर क्रियांकडे लक्ष देण्यासाठी पुरेशी वेळ मिळते. त्यामुळे स्कीन चांगली राहणे, केस मजबूत होणे आदी कामे या काळात पार पाडली जातात. शिवाय शरीरातील अनावश्यक घटक यावेळी बाहेर टाकले जातात. शरीर शुद्ध होते.  

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्री