अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे आणि लोकांच्या खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोक वेगवेगळ्या डाएट फॉलो करतात. अनेकदा वजन कमी करण्यासाठी लो कॅलरी डाएटसोबत एक्सरसाइजचा सल्ला दिला जातो. तसे एक्सरसाइजचे वेगवेगळे फायदे असतात. पण डाएटमधून कॅलरीचं प्रमाण कमी होत असेल तर याने तुमचं नुकसानही होऊ शकतं. ही बाब एका रिसर्चमधून समोर आली आहे.
जर्नल ऑफ बोन मिनरल रिसर्चमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, जर तुम्ही डाएटमध्ये कमी कॅलरी घेत असाल आणि सोबतच एक्सरसाइज करत असाल तर याने तुमच्या हाडांचं नुकसान होऊ शकतं. असं केल्यास हाडांमध्ये फ्रॅक्चरचा धोका वाढतो.
या रिसर्चच्या मुख्य लेखकांनुसार, रिसर्चच्या निष्कर्षांनी त्यांना धक्का बसलाय. याआधी उंदरांवर करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आले होते की, नॉर्मल कॅलरी डाएट किंवा हाय कॅलरी डाएटसोबत एक्सरसाइज करणं हाडांसाठी चांगलं असतं. मात्र, आता समोर आलं आहे की, जर तुम्ही कॅलरी कमी घेत असाल तर हे नुकसानकारक ठरू शकतं.
रिसर्चमध्ये अभ्यासकांनी उंदरांच्या बोन मॅरोमध्ये असलेलं फॅट पाहिलं. याआधीच्या रिसर्चमधून समोर आलं होतं की, अशाप्रकारचा फॅट हाडांना कमजोर करतं. टीमने याची माहिती मिळवली की, उंदरांचं ३० टक्के कॅलरी इनटेक कमी केल्याने वजन कमी केलं जाऊ शकतं, पण इनटेक कमी केल्याने बोन मॅरोमध्ये फॅट वाढतं.
तसेच रिसर्चमधून असंही समोर आलं आहे की, फिजिकल अॅक्टिविटी वाढवल्याने बोन मॅरो कमी होतो, पण हाडे कमजोर होतात. अभ्यासकांच्या टीमने हा रिसर्च सुरूच ठेवला असून हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की, बोन मॅरो फॅट कशाप्रकारे शरीराला प्रभावित करतं.