शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

कमी रक्तदाबामुळे स्ट्रोक नंतर मृत्यू होण्याचा धोका, नवीन संशोधनातून धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 12:10 IST

एका नवीन संशोधनातून असंही दिसून आलं आहे की कमी रक्तदाब हे स्ट्रोक आणि त्यानंतरच्या मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष स्ट्रोक जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत.

आजची धावपळीची जीवनशैली, अनियमित दिनचर्या, वाढते प्रदूषण अशी अनेक कारणं विविध आजारांना कारणीभूत ठरत आहेत. यापैकी एक म्हणजे रक्तदाबाची समस्या. Hypertension म्हणजेच उच्च रक्तदाब हे पक्षाघात आणि मृत्यूचे प्रमुख कारण असल्याचे आतापर्यंतच्या संशोधनातून दिसून आलं आहे. परंतु, आता एका नवीन संशोधनातून असंही दिसून आलं आहे की कमी रक्तदाब हे स्ट्रोक आणि त्यानंतरच्या मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष स्ट्रोक जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत.

यामध्ये संशोधकांनी हृदय, कर्करोग आणि स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांमध्ये याचा मोठा धोका सांगितला आहे. बोस्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनमधील न्यूरोलॉजीचे सहायक प्राध्यापक आणि संशोधनात सहभागी असलेल्या फ्रेमिंगहॅम हार्ट स्टडीमधील संशोधक ह्यूगो जे अपारिसियो यांच्या मते कमी रक्तदाबामध्ये स्ट्रोकनंतर मृत्यू होण्याचा धोका जास्त असतो. धूम्रपान करणाऱ्या किंवा हृदयविकार आणि कर्करोगाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी (Risk of Death in Low Blood Pressure) स्थिती अधिक गंभीर होऊ शकते.

संशोधकांच्या मते, स्ट्रोकच्या उपचारांसाठी सध्याची मार्गदर्शक तत्त्वे ही स्ट्रोकनंतर उच्च रक्तदाबावर उपचार करण्याची शिफारस करतात. तसेच या उपचाराच्या वेळी सामान्य किंवा कमी रक्तदाबावर कोणते उपचार करायचे यावर अभ्यासात चर्चा केली गेली.

३० हजार रुग्णांवर संशोधनसंशोधकांनी सांगितले की, या संशोधनासाठी इस्केमिक स्ट्रोक असलेल्या सुमारे 30,000 वृद्ध रुग्णांची माहिती घेण्यात आली. ज्यांना स्ट्रोकपूर्वी बीपीची समस्या होती. या आधारावर, संशोधकांनी स्ट्रोकनंतर कमी आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांच्या मृत्यूचे मूल्यांकन केले. संशोधकांना असे आढळून आले की कमी रक्तदाब असलेल्या लोकांचा मृत्यू दर सर्वात जास्त आहे, विशेषत: जर ते धूम्रपान करत असतील किंवा हृदय, कर्करोग यांसारख्या आजारांनी ग्रस्त असतील.

कमी रक्तदाब असलेल्या १० टक्के रुग्णांना मृत्यूचा धोका जास्तह्यूगो जे अपारिसिओ यांनी सांगितले की, त्यांच्या संशोधनानुसार, कमी ते सामान्य बीपीची पार्श्वभूमी असलेल्या स्ट्रोकच्या रुग्णांपैकी 10 टक्के रुग्णांना स्ट्रोकनंतर मृत्यूचा धोका जास्त असतो. ते म्हणाले की, संशोधकांना आशा आहे की स्ट्रोकनंतर मृत्यूला कारणीभूत घटकांचे परीक्षण करून, रुग्ण, नातेवाईक आणि डॉक्टर कमी रक्तदाब सारख्या परिस्थिती चांगल्या प्रकारे समजू शकतात आणि ओळखू शकतात. याद्वारे ते आरोग्याच्या लक्षणांचा अंदाज लावू शकतात.

ते म्हणाले की निश्चितपणे ही माहिती धूम्रपान, हृदयरोग आणि कर्करोग यांसारख्या आजारांवर उपचार घेत असलेल्या पक्षाघाताच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे त्यांना स्ट्रोक झाल्यास बरे होण्याची आणि जगण्याची संधी मिळेल.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स