शहरं
Join us  
Trending Stories
1
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश
2
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
3
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
4
आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
5
ही दोस्ती तुटायची नाय...! एकत्र केली UPSC तयारी; दोघं IAS तर एक मित्र IPS बनला
6
Veritaas Advertising IPO: लिस्ट होताच शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, ₹१४४ चा शेअर पोहोचला ₹२८८ वर; गुंतवणूकदार मालामाल
7
...म्हणूनही मला संघात घेतलं नव्हतं; Gautam Gambhir चा खळबळजनक खुलासा
8
सावधान! RTO ने नियम बदलले, १ जूनपासून लागू होणार नवे रुल्स;...तर भरावा लागेल २५ हजारांचा दंड
9
काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली
10
'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत
11
“RSS चा स्वयंसेवक होतो, पुन्हा संघटनेत काम करायला तयार आहे”; हायकोर्ट जजने थेट सांगितले
12
कतरिना कैफही आहे गरोदर? ओव्हरकोट ड्रेसमध्ये दिसला बेबीबंप; नवऱ्यासोबत लंडनमध्ये फेरफटका
13
कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली
14
'कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले'; पोलिसांवरील आरोपांनंतर पोलीस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
15
वडिलांना वाढदिवसाचे सरप्राइज द्यायचे राहिले, त्या आधीच देवाने...! ससूनच्या शवागारात आईचा आक्रोश
16
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
17
'बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने', राजीव गांधींच्या पुण्यतिथीला राहुल गांधी झाले भावूक, जुना फोटो केला शेअर
18
"दोन मुडदे पडले असताना तुम्ही त्याला पिझ्झा खायला घालता"; पुणे पोलीस आयुक्तांवर संतापले संजय राऊत
19
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
20
₹३३९ वरून ₹४८३० वर पोहोचला 'या' सरकारी कंपनीचा शेअर, PM मोदींनीही केलेला उल्लेख 

लाॅकडाऊनमुळे गुडघेदुखीच्या तक्रारींमध्ये झाली वाढ, घरून काम सुरू असल्याचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 6:59 AM

knee pain : सध्या थंडी वाढल्यानेही गुडघेदुखीचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण अस्थिरोग तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

मुंबई : लाॅकडाऊन आणि वर्क फ्रॉम होममुळे अनेक वयोगटांतील व्यक्तींमध्ये गुडघेदुखीच्या तक्रारीत वाढ झाल्याचे दिसून येते आहे. मंदावलेली हालचाल, एकाच ठिकाणी बसण्याच्या सवयीमुळे आखडलेले सांधे आदींमुळे सहा महिन्यांनंतर गुडघेदुखीचा त्रास वाढल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांत अस्थिरोग, सांधेरोपण तज्ज्ञांकडे गुडघेदुखीच्या तक्रारी घेऊन येणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे.कोरोनाच्या काळात कित्येक महिने नागरिकांना घरी बसावे लागले. आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याने घराबाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने गुडघेदुखीची समस्या उद्भवली आहे. त्यामुळे शारीरिक हालचालींना आलेला वेग, तसेच चुकीच्या पद्धतीने केले जाणारे व्यायाम यामुळे गुडघ्यांवर विपरीत परिणाम होत आहे. सध्या थंडी वाढल्यानेही गुडघेदुखीचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण अस्थिरोग तज्ज्ञांनी नोंदविले आहे. ‌‘लॉकडाऊनमध्ये नागरिकांच्या शारीरिक हालचाली मंदावल्या होत्या. व्यायामाच्या अभावामुळे अनेकांचे वजन वाढले आहे. ४० ते ६० या वयोगटांतील सुमारे ७० टक्के नागरिकांना गुडघेदुखीची समस्या भेडसावत आहे. अनेकदा चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्याने गुडघ्यावर अतिरिक्त भार येत असल्याने वेदना होतात, अशी माहिती अस्थिविकार तज्ज्ञ डॉ. अलोक दामले यांनी दिली आहे.अनलॉकनंतर दहापैकी आठ रुग्णांमध्ये गुडघेदुखीची समस्या दिसून येत आहे. निरोगी आहार आणि व्यायामामुळे आपली हाडे, स्नायू आणि सांधे मजबूत राहतात. हाडांना दररोज किमान २० मिनिटे सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक आहे. 

निरोगी राहायला हवेनिरोगी आहार आणि व्यायामामुळे आपली हाडे, स्नायू आणि सांधे मजबूत राहतात. हाडांना दररोज किमान २० मिनिटे सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक आहे. औषधे घेतल्यानंतरही गुडघेदुखी कायम राहत असेल, तर नियमित व्यायाम आणि जीवनशैलीत बदल करणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

गुडघेदुखी कशी टाळाल - आवश्यकतेनुसार वेदनाशामक औषधे घेणे. - दररोज व्यायाम करणे, चालणे, दीर्घकाळ उभे राहणे किंवा बसणे टाळावे- वजन नियंत्रणात ठेवणे. - संतुलित आहार घ्यावा. - अति ट्रेकिंग, चढ-उतार करणे टाळावे. - फिजिओथेरपिस्ट किंवा योग प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली व्यायाम करा. - हिरव्या पालेभाज्या, दूध, फळे, बीट, सोयाबीन, माशांचा आहारात समावेश करावा.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य