​ लाईट, कॅमेरा....अन् अ‍ॅक्टिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2016 05:34 IST2016-03-13T11:29:05+5:302016-03-13T05:34:13+5:30

लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन....असे जोराने ओरडत मोठ-मोठ्या स्टार्सना आपल्या इशाºयावर नाचवणारे दिग्दर्शकही अभिनयाच्या चुंबकीय आकर्षणातून सुटू शकलेले नाहीत. आपली प्रतिभा, आपले परिश्रम पडद्यामागे राहते. कधी तेही जेगापुढे यावे असा विचार म्हणूनच या दिग्दर्शकांच्याही मनात येत असतो.

Light, camera ... and acting! | ​ लाईट, कॅमेरा....अन् अ‍ॅक्टिंग!

​ लाईट, कॅमेरा....अन् अ‍ॅक्टिंग!

ईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन....असे जोराने ओरडत मोठ-मोठ्या स्टार्सना आपल्या इशाºयावर नाचवणारे दिग्दर्शकही अभिनयाच्या चुंबकीय आकर्षणातून सुटू शकलेले नाहीत. आपली प्रतिभा, आपले परिश्रम कायमच पडद्यामागे राहते. कधी तेही जेगापुढे यावे असा विचार म्हणूनच या दिग्दर्शकांच्याही मनात येत असतो. परंतु सर्वांनाच काही अभिनयाचे हे शिवधनुष्य पेलता येत नाही. एखादाच प्रकाश झा, फरहान अख्तर असतो जो दिग्दर्शक-अभिनेता या दोन्ही भूमिकेत यशस्वी होतो. अशाच काही दिग्दर्शक-अभिनेत्यांची ही एक ओळख...
प्रकाश झा
नामवंत दिग्दर्शक प्रकाश झा यांनी ‘जय गंगाजल’ या चित्रपटात भोलानाथ सिंग उर्फ बी. एन. सिंग ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटात प्रियंका चोप्रा मुख्य भूमिकेत असतानाही प्रकाश झा यांच्या भूमिकेचे कौतुक झाले. चित्रपटात ज्या पद्धतीने त्यांनी संवादफेक केली आहे ती खरच कमालीची आहे. भावनिक दृश्यातही त्यांनी हृदयस्पर्शी अभिनय केला आहे. ज्याची समीक्षकांनीही दखल घेतली आहे. 

फरहान अख्तर
‘दिल चाहता है’ या चित्रपटापासून दिग्दर्शक म्हणून सुरुवात केलेल्या फरहान अख्तरने पुढे ‘रॉक आॅन’, ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटात अभिनयाची छाप सोडली. त्याचा चेहरा आणि त्याचे व्यक्तिमत्त्व पाहता, त्याला हीरो म्हणून पुढे येण्यास खूप कष्ट करावे लागले. परंतु अभिनयात दम असल्याने त्याने या क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली. 

करण जोहर
‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यापूर्वी करण जोहरने ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’ या चित्रपटात शाहरुखच्या मित्राची छोटीशी भूमिका साकारली होती. मात्र पुढे काही त्याने असे धाडस केले नाही. बºयाच वर्षांनी ‘बॉम्बे व्हेल्वेट’मध्ये एक नव्या वळणाची भूमिका मिळाली आणि या चित्रपटात करणने जोरदार अभिनय केला. विशेष म्हणजे, स्वत: अभिनयाचा शौक बाळगणाºया अनुराग कश्यप यांनी करण जोहर यांना संधी दिली.

कुणाल कोहली
दूरचित्रवाणीवरील ‘चलो सिनेमा’ या मालिकेत अँकर असणाºया कुणाल कोहली यांनी ‘हम तुम’ आणि ‘फना’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. आता कुणाल कोहली यांनीही अभिनयाची वाट धरली आहे. त्यांनी ‘फिर से’ या चित्रपटात अभिनय केला. एक परिपक्व, रोमँटिक हीरोची भूमिका त्यांनी या चित्रपटात साकारली. 

Web Title: Light, camera ... and acting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.